Petrol Diesel Prices In Maharashtra : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. तर आज ३ मार्च २०२४ रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर झाल्या आहेत. या इंधनाच्या किमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर (Petrol And Diesel Prices) कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांतील इंधनाचा दर तपासून घ्या आणि तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol And Diesel Prices)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९३९०.४८
अकोला१०४.७१९१.२५
अमरावती१०५.१६९१.६९
औरंगाबाद१०५.५०९२.०३
भंडारा१०४.९९९१.५२
बीड१०४.८२९१.३३
बुलढाणा१०५.२४९१.७६
चंद्रपूर१०४.४६ ९१.०२
धुळे१०४.०२९०.५६
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.१०९१.५९
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.२३९०.७८
लातूर१०५.४२९१.९२
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०४९०.६०
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.४९९१.४८
नाशिक१०४.५४९१.०६
उस्मानाबाद१०५.३४९१.८५
पालघर१०३.९२९०.४३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.७३९१.२४
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.४५९१.९६
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.८९९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५७९१.१०
ठाणे१०३.६८९०.२०
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.९५९१.४८
यवतमाळ१०५.२८९१.७९

आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या बजेटवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol And Diesel Prices) कमी असतील तर नागरिकांना आनंद देखील होतो. त्यामुळे, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण – आज पेट्रोल व डिझेलचे दर किंचित कमी झाले आहेत.

घरबसल्या चेक करा नवे दर (Petrol And Diesel Prices) :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मारुतीच्या ‘या’ कारमध्ये मिळणार सहा एअरबॅग्ज!

मारुती सुझुकीच्या अल्टो के१० ला दोन नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. अल्टो के१० च्या सर्व व्हेरिएंटमध्ये आता सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारच्या किमतीत १६ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता मारुती अल्टो के१० ची किंमत ४.२३ लाख रुपयांपासून ते ६.२१ लाख रुपयांपर्यंत (दोन्ही एक्स-शोरूम) असेल.सहा एअरबॅग्जव्यतिरिक्त मागच्या प्रवाशांसाठी तीन पॉइंट सीट बेल्टही अपग्रेड करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त चाइल्ड सेफ्टी लॉक (rear door child lock) इंजिन इमोबिलायझर, हाय-स्पीड ॲलर्ट सिस्टम, फोर्स लिमिटरसह फ्रंट सीट बेल्ट प्रीटेन्शनर्स, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, हेडलॅम्प लेव्हलिंग व हाय माऊंट स्टॉप लॅम्पसुद्धा देण्यात आला आहे.