Petrol and Diesel Prices In Marathi : कच्च्या तेलाच्या किमतीचे थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक गणितांवर होत असतात. गेल्या काही काळापासून पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ तर किरकोळ घट पाहता वाहनं चालवायची की नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वरखाली होत असतानाच गुरुवारी सकाळी सरकारी तेल विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे (Petrol and Diesel Prices) नवे दर जाहीर केले.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत (Petrol and Diesel Prices) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.३९ | ९०.९१ |
अकोला | १०४.१२ | ९०.६८ |
अमरावती | १०५.०६ | ९१.५९ |
औरंगाबाद | १०५.६२ | ९२.१० |
भंडारा | १०४.८८ | ९१.६१ |
बीड | १०५.३८ | ९१.८७ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.४१ |
चंद्रपूर | १०४.४० | ९०.९६ |
धुळे | १०४.३२ | ९०.८५ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.६१ | ९२.११ |
जळगाव | १०५.७९ | ९२.२५ |
जालना | १०५.४५ | ९१.९३ |
कोल्हापूर | १०४.२७ | ९०.८२ |
लातूर | १०५.८० | ९२.२९ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.३७ | ९०.९२ |
नांदेड | १०६.२३ | ९२.७१ |
नंदुरबार | १०४.४२ | ९१.९२ |
नाशिक | १०४.२८ | ९०.८० |
उस्मानाबाद | १०५.१२ | ९१.६३ |
पालघर | १०३.६९ | ९०.२० |
परभणी | १०६.६८ | ९३.१३ |
पुणे | १०४.४१ | ९०.९२ |
रायगड | १०३.६९ | ९०.२१ |
रत्नागिरी | १०५.९३ | ९२.४२ |
सांगली | १०४.१८ | ९०.७३ |
सातारा | १०४.९९ | ९१.४८ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.०३ | ९०.५८ |
ठाणे | १०३.५८ | ९०.१० |
वर्धा | १०४.५२ | ९१.०७ |
वाशिम | १०४.९९ | ९१.५१ |
यवतमाळ | १०५.८२ | ९२.३२ |
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हे दर बदलल्याचं लक्षात आलं. असं असलं तरीही काही शहरांमध्ये आज पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol and Diesel Prices) कमी झाल्याचे दिसून आले. देशातील तीन प्रमुख सरकारी कंपन्या, इंडियन ऑइल (IOC), BPCL (BPCL) आणि HPCL (HPCL) यांनी सकाळी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर मोबाईलवरच तपासा (Petrol and Diesel Prices) :
तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.
आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक :
दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढू लागली आहे. पण, या इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागणे, त्यांचा स्फोट होणे आदी घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर त्यावर उपाय म्हणून भारतीय इलेक्ट्रिक बाईक निर्माता ओबेन इलेक्ट्रिकने त्यांच्या आगामी मोटरसायकलचा टीझर रिलीज केला आहे. या मोटरसायकलचे नाव (Oben Electric Rorr EZ) असं आहे. तसेच ७ नोव्हेंबर रोजी ही मोटरसायकल लाँच होणार आहे. Oben Electric Rorr EZ एक नवीन प्रकारची बाईक आहे; जी बाईक चालविताना येणार्या सामान्य समस्यांवर उपाय शोधू शकेल. या बाईकमध्ये एक खास एलपीएफ म्हणजे लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ही बॅटरी उष्णता सहन करण्याची क्षमता, टिकाऊपणा आणि भारताच्या विविध हवामानात विश्वसनीयतेसाठी ओळखली जाणार आहे.