Petrol And Diesel Rates on Maharashtra Assembly Election Result 2024 : आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकालकाही तासांतच स्पष्ट होईल. महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. सर्व सामान्य जनता कोणाच्या बाजूने असणार हे पाहणं आज रंजक ठरणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे भाव (Petrol And Diesel Rates) आज वधारले का हे आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.८३ | ९१.३४ |
अकोला | १०४.५५ | ९१.१० |
अमरावती | १०५.५३ | ९२.०४ |
औरंगाबाद | १०५.३६ | ९१.८४ |
भंडारा | १०४.८२ | ९१.३५ |
बीड | १०४.७६ | ९१.२७ |
बुलढाणा | १०५.३२ | ९१.८४ |
चंद्रपूर | १०४.४० | ९०.९६ |
धुळे | १०३.९० | ९०.९५ |
गडचिरोली | १०४.९८ | ९१.५१ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.६१ | ९१.९५ |
जळगाव | १०४.३५ | ९०.७८ |
जालना | १०५.७४ | ९२.७२ |
कोल्हापूर | १०४.८४ | ९१.०९ |
लातूर | १०५.२६ | ९२.०१ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.०६ | ९०.५२ |
नांदेड | १०६.५१ | ९२.७२ |
नंदुरबार | १०४.९१ | ९१.२९ |
नाशिक | १०४.४८ | ९१.२७ |
उस्मानाबाद | १०४.७७ | ९१.३६ |
पालघर | १०४.४६ | ९२.२० |
परभणी | १०७.३९ | ९३.१३ |
पुणे | १०३.७६ | ९०.३७ |
रायगड | १०४.०६ | ९१.२६ |
रत्नागिरी | १०५.३९ | ९२.०७ |
सांगली | १०४.६८ | ९१.४९ |
सातारा | १०४.६६ | ९१.५६ |
सिंधुदुर्ग | १०५.५८ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.७९ | ९०.९४ |
ठाणे | १०३.६२ | ९०.३९ |
वर्धा | १०४.८५ | ९१.०० |
वाशिम | १०४.९९ | ९१.६१ |
यवतमाळ | १०४.९३ | ९२.२९ |
२३ नोव्हेंबर २०२४ चे पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol And Diesel Rates) सकाळी सहा वाजता जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर आज वाढल्याचे झाल्याचे चित्र दिसत आहे.
मोबाईलवर चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol And Diesel Rates) :
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. तुम्ही घरी बसूनही इंधनाचे दर चेक करू शकता. SMS च्या मदतीने तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर घरबसल्या चेक करू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्हाला RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवा. तुम्ही बीपीसीएलचे ग्राहक आहात तर तुम्हाला RSP लिहून आणि 9223112222 या नंबरवर पाठवलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमतीबद्दल माहिती मिळेल. तुम्ही HPCL चे ग्राहक असाल, तर तुम्ही HP Price टाइप करून 9222201122 या क्रमांकावर पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS द्वारे मिळतील.
स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका :
स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक (Skoda Kylaq) लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत आहे. ही बोल्ड आणि मॉडर्न एसयूव्ही भारतीय कार खरेदीदारांना तिच्या आकर्षक डिझाईन आणि टॉप-टायर फीचर्ससह आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. Skoda Kylaq ही नवीन गाडी २ डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच २७ जानेवारी २०२५ पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.