Petrol, diesel prices on May 31: मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून जून सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार की त्यांना थोडा दिलासा मिळणार हे आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून तुम्हाला समजून येईल. काही शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव कमी तर काही ठिकाणी हा भाव जास्त तर काही ठिकाणी अगदीच स्थिर पाहायला मिळाला आहे. तर मुंबई,पुण्यासह महाराष्ट्र्रातील विविध शहरात पेट्रोल-डिझेलचा काय दर सुरु आहे हे पुढील तक्त्यात तपासून घ्या…
पेट्रोल-डिझेलचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींवर ठरतात. महाराष्ट्रातील काही शहरांत मे महिन्याच्या अखेरीस पेट्रोल-डिझेलच्या भावात किंचित बदल झाला आहे. २९ मे २०२४ रोजी अमरावती शहराची पेट्रोलची किंमत १०५.०५ रुपये प्रति लिटर होती. तर आजच्या तारखेला अमरावती शहराची पेट्रोलची किंमत कमी होऊन १०४.८२ रुपये प्रति लिटर झाली आहे. तर वाशीम शहरांत २९ मे २०२४ रोजी पेट्रोलची किंमत १०४.५७ रुपये प्रति लिटर होती. तर आजच्या तारखेला पेट्रोलच्या किंमतीत किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे. वाशीम शहरांत पेट्रोलचा आजचा दर १०५.२६ रुपये प्रति लिटर आहे.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.८८ | ९१.३९ |
अकोला | १०४.१६ | ९०.७२ |
अमरावती | १०४.८२ | ९१.३५ |
औरंगाबाद | १०४.९९ | ९१.४८ |
भंडारा | १०५.०२ | ९१.५५ |
बीड | १०५.०४ | ९१.९५ |
बुलढाणा | १०४.३६ | ९०.९१ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९०.६२ |
धुळे | १०३.९६ | ९०.५० |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.१५ | ९१.६६ |
हिंगोली | १०५.४४ | ९१.९५ |
जळगाव | १०४.३५ | ९०.८८ |
जालना | १०५.७६ | ९२.२२ |
कोल्हापूर | १०४.४७ | ९१.०१ |
लातूर | १०५.७० | ९२.१८ |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०४.१६ | ९०.७० |
नांदेड | १०६.४५ | ९२.९२ |
नंदुरबार | १०५.१४ | ९१.६४ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०४.७७ | ९१.३० |
पालघर | १०४.०१ | ९०.४४ |
परभणी | १०७.३४ | ९३.६६ |
पुणे | १०४.२३ | ९०.७५ |
रायगड | १०४.०३ | ९०.५४ |
रत्नागिरी | १०५.९६ | ९२.४५ |
सांगली | १०४.१७ | ९०.७३ |
सातारा | १०४.३५ | ९०.७८ |
सिंधुदुर्ग | १०५.९० | ९२.३९ |
सोलापूर | १०४.३० | ९०.८२ |
ठाणे | १०४.४१ | ९२.३४ |
वर्धा | १०४.११ | ९०.६७ |
वाशिम | १०५.२६ | ९१.११ |
यवतमाळ | १०५.७० | ९१.७८ |
सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.
मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोलची किंमत १०४.२४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांत उद्या १ जून २०२४ रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार का नागरिकांना दिलासा मिळणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहील. तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर एसएमएसद्वारेही तपासून पाहू शकता आणि बाहेर निघण्यापूर्वी पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.