Petrol Diesel Price Changes In Maharashtra : आज १९ नोव्हेंबर रोजी, सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. तर या पाश्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तर आज पेट्रोल व डिझेलचा आजचा भाव काय आहे हे आपण जाणून घेऊया…
महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Changes)
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.३९ | ९०.९१ |
अकोला | १०४.०७ | ९०.६३ |
अमरावती | १०५.३६ | ९१.८७ |
औरंगाबाद | १०५.२७ | ९१.७६ |
भंडारा | १०४.५१ | ९१.०६ |
बीड | १०५.६८ | ९२.१७ |
बुलढाणा | १०५.३२ | ९१.८४ |
चंद्रपूर | १०४.४० | ९०.९६ |
धुळे | १०४.३२ | ९०.८५ |
गडचिरोली | १०४.९४ | ९१.४८ |
गोंदिया | १०५.७७ | ९२.२६ |
हिंगोली | १०५.३४ | ९१.८५ |
जळगाव | १०४.१६ | ९०.७० |
जालना | १०६.१२ | ९२.५८ |
कोल्हापूर | १०४.३५ | ९०.९० |
लातूर | १०५.७७ | ९२.२५ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.०३ | ९०.५९ |
नांदेड | १०६.२९ | ९२.७५ |
नंदुरबार | १०४.७२ | ९१.२७ |
नाशिक | १०४.७८ | ९१.२९ |
उस्मानाबाद | १०४.८५ | ९१.३७ |
पालघर | १०४.१७ | ९०.६७ |
परभणी | १०६.३९ | ९२.८६ |
पुणे | १०३.९८ | ९०.५१ |
रायगड | १०४.३२ | ९१.२० |
रत्नागिरी | १०५.७९ | ९२.२९ |
सांगली | १०४.०८ | ९०.६४ |
सातारा | १०४.७२ | ९१.२६ |
सिंधुदुर्ग | १०५.९० | ९२.३९ |
सोलापूर | १०४.९५ | ९१.४७ |
ठाणे | १०३.६४ | ९०.१६ |
वर्धा | १०४.३३ | ९०.८८ |
वाशिम | १०४.६८ | ९१.२२ |
यवतमाळ | १०५.८२ | ९२.३२ |
तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये (Daily Petrol Diesel Price ) घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे.
घरबसल्या चेक करा नवे दर :
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा…Car Driving Tips: धुक्यात गाडी चालवताना समोरचं दिसत नाही? मग ‘या’ ट्रिक्सची तुम्हाला होईल मदत
होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा येणार :
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचा कौल इव्ही वाहनांकडे जाऊ लागला आहे, हे लक्षात घेता होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात येणार आहे. अॅक्टिव्हाला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे कंपनीने या स्कूटरचे 2G 3G 4G असे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. आता कंपनी याचा अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.अपकमींग होंडा एक्टिव्हा इलेक्ट्रिक अनेक डिस्प्ले ऑप्शनसह येईल.