Petrol and Diesel Price: गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळाला आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज १८ जून २०२४ रोजी किती फरकानं पेट्रोल-डिझेलचे दर कामी झाले आहेत या लेखातून सविस्तर जाऊन घेऊ. तसेच तुमच्या शहरांत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहे हे सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यातून तपासून घेऊ शकता.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.४४ | ९०.९७ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.५३ | ९२.०४ |
औरंगाबाद | १०४.९३ | ९१.४३ |
भंडारा | १०४.७४ | ९१.२७ |
बीड | १०५.२९ | ९१.७९ |
बुलढाणा | १०४.८४ | ९१.३७ |
चंद्रपूर | १०४.४६ | ९१.०२ |
धुळे | १०४.४९ | ९१.०२ |
गडचिरोली | १०५.१८ | ९१.७१ |
गोंदिया | १०५.७७ | ९२.२६ |
हिंगोली | १०५.८५ | ९२.३४ |
जळगाव | १०४.०६ | ९०.६१ |
जालना | १०६.१२ | ९२.५८ |
कोल्हापूर | १०४.८४ | ९१.३७ |
लातूर | १०५.२६ | ९१.७७ |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०४.०६ | ९०.६२ |
नांदेड | १०५.८१ | ९२.३१ |
नंदुरबार | १०४.९१ | ९१.४२ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.३३ | ९१.८३ |
पालघर | १०३.८६ | ९०.३७ |
परभणी | १०६.९३ | ९३.३५ |
पुणे | १०४.३९ | ९०.९० |
रायगड | १०४.१२ | ९०.६२ |
रत्नागिरी | १०५.३९ | ९१.९० |
सांगली | १०४.२८ | ९०.८३ |
सातारा | १०४.६४ | ९१.१५ |
सिंधुदुर्ग | १०५.९० | ९२.३९ |
सोलापूर | १०४.७९ | ९१.३२ |
ठाणे | १०३.६९ | ९०.२० |
वर्धा | १०४.८५ | ९१.३८ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०४.७६ | ९१.३१ |
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील गोंदिया, हिंगोली, नाशिक, परभणी या शहरांत डिझेलच्या किमतीत किंचित दरवाढ झालेली दिसून आली आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे या शहरांत डिझेलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. आज महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, पालघर, ठाणे या शहरांत पेट्रोलच्या किमतीत घसरण तर हिंगोली, जालना, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, रायगड या शहरांत पेट्रोलच्या किमतीत किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे.
आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तर काही ठिकाणी दर अगदीच स्थिर दिसून आले आहेत. तसेच मुंबईत मात्र अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला अद्याप दिसून आलेला नाही. तर तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून, घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्हीसुद्धा पेट्रोल-डिझेलचे दर नक्की एकदा तपासून घ्या.
तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात.
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे.