Petrol & Diesel Rates : आज १२ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होताना दिसत आहे. यादरम्यान मित्र-मैत्रिणींबरोबर मुंबईतील गणपती पाहण्यासाठी काही जण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यात अनेक जण ट्रेन, बसने प्रवास करतात तर काही जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहेत. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा (Petrol & Diesel) भाव काय असेल हे तपासून घ्या .

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल-डिझेलचे ( Petrol & Diesel) दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०३.९३९०.४८
गडचिरोली१०५.८२९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.४८९१.०२
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.७२९०.२३
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.७७९०.३०
रायगड१०३.७३९०.२५
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.२२९०.७८
सातारा१०४.५२९१.०६
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.९२९०.३१
वर्धा१०४.४९९०.६७
वाशिम१०४.६५९१.१९
यवतमाळ१०४.९७९१.४०

पेट्रोल-डिझेलचे (Petrol & Diesel) दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. कारण – तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात. तर आजचे दर पाहता काही ठिकाणी पेट्रोलचे दर किंचित कमी तर काही ठिकाणी किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

हेही वाचा…Tata Motors : सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा अन् बरेच सेफ्टी फीचर्स; भारतात लाँच झाली कूपे-एसयूव्ही; किंमत फक्त…

स्कुटी चालवताना या टिप्स करतील तुम्हाला मदत :

जर तुम्ही नियमितपणे स्कुटी चालवत असाल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की, जर तुम्ही ४५-५० च्या वेगाने गाडी चालवली आणि विनाकारण ब्रेकवर हात ठेवला नाही, तर तुमची स्कूटी सुरळीत चालते. इंजिनावर कोणताही ताण येत नाही आणि क्लच प्लेटही व्यवस्थित राहते.तसेच स्कुटी अचानक थांबवू नका. स्कुटी थांबविण्यासाठी, प्रथम तिचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करा. शक्य तितका कमी ब्रेक वापरा. गाडीचा वेग अचानक वाढवू नका किंवा अचानक थांबवू नका. अशी चांगली सवय मुळे इंजिनाचे आयुष्य अधिक वाढते

Story img Loader