Petrol & Diesel Price Today : आज ९ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात व ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात; जेणेकरून घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा ( Petrol & Diesel ) भाव काय असेल हे त्यांना समजू शकेल. तर आज तुमच्या शहरांत काय भाव आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे ( Petrol & Diesel) दर :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.३५ | ९०.८७ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०५.३१ | ९२.८० |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.८२ | ९२.३० |
बुलढाणा | १०४.७३ | ९१.२७ |
चंद्रपूर | १०४.०८ | ९०.६६ |
धुळे | १०४.६१ | ९१.१३ |
गडचिरोली | १०५.१६ | ९१.६९ |
गोंदिया | १०५.५९ | ९२.०९ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.१४ | ९१.६६ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.३९ | ९०.९४ |
लातूर | १०५.२९ | ९१.८० |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०३.९८ | ९०.५४ |
नांदेड | १०६.२४ | ९२.७१ |
नंदुरबार | १०५.१७ | ९१.६७ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०३.७९ | ९०.४८ |
परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
पुणे | १०३.८८ | ९०.४१ |
रायगड | १०३.८९ | ९०.४० |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४८ | ९१.०२ |
सातारा | १०५.०७ | ९१.५६ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०५.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०३.७९ | ९०.३१ |
वर्धा | १०४.४४ | ९०.९९ |
वाशिम | १०४.५७ | ९१.११ |
यवतमाळ | १०४.९५ | ९१.४८ |
पेट्रोल-डिझेलचे ( Petrol & Diesel) दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. कारण – तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात. तर आजचे दर पाहता काही ठिकाणी पेट्रोलचे दर किंचित कमी तर काही ठिकाणी किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे.
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol & Diesel) किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.
हेही वाचा…गणेश चतुर्थीला Yamaha ची दुचाकी आणा घरी; भरपूर कॅशबॅक मिळणार; कधीपर्यंत ‘ही’ ऑफर असणार?
कार खरेदी करताना हे मुद्दे ठेवा लक्षात :
कार खरेदी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी कंपन्या ग्राहकांपासून लपवतात किंवा त्यांना कमी प्राधान्य देतात. त्यामुळे कार खरेदी करताना पुढील मुद्दे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मायलेज, गाडीचा देखभाल खर्च, सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्ट यांची उपलब्धता, सेफ्टी फीचर्सचे महत्त्व, वॉरंटी, काही मॉडेल्सची रीसेल व्हॅल्यू इतर कारच्या तुलनेत कमी असू शकते आणि ही बाब कंपन्या उघड करीत नाहीत; त्यामुळे कार खरेदी करताना त्याबद्दलही चौकशी करून घ्या.