Petrol and Diesel Price Today : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे आज २९ नोव्हेंबर २०२४ चे दर पाहता पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol and Diesel Price Today) किंचित वाढलेले दिसत आहेत. तर तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलचे दर काय आहेत चला जाणून घेऊया…
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर ( Petrol and Diesel Price Today) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.५३ | ९१.०६ |
अकोला | १०४.५८ | ९१.१२ |
अमरावती | १०४.८२ | ९१.३५ |
औरंगाबाद | १०५.१९ | ९१.६८ |
भंडारा | १०४.५१ | ९१.०६ |
बीड | १०५.६८ | ९२.१७ |
बुलढाणा | १०४.८२ | ९१.३६ |
चंद्रपूर | १०४.४० | ९०.९६ |
धुळे | १०४.३२ | ९०.८५ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.७७ | ९२.२६ |
हिंगोली | १०५.८५ | ९२.३४ |
जळगाव | १०४.२५ | ९०.७९ |
जालना | १०५.७८ | ९२.२४ |
कोल्हापूर | १०४.४८ | ९१.०२ |
लातूर | १०५.६३ | ९२.१३ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.१२ | ९०.६८ |
नांदेड | १०६.२८ | ९२.७६ |
नंदुरबार | १०४.९१ | ९१.४२ |
नाशिक | १०४.३५ | ९०.८८ |
उस्मानाबाद | १०४.८५ | ९१.३७ |
पालघर | १०४.६७ | ९१.१५ |
परभणी | १०७.०८ | ९३.४९ |
पुणे | १०३.९८ | ९०.५१ |
रायगड | १०४.७२ | ९१.२० |
रत्नागिरी | १०५.७९ | ९२.२९ |
सांगली | १०३.९८ | ९०.५४ |
सातारा | १०४.७२ | ९१.२६ |
सिंधुदुर्ग | १०५.९० | ९२.३९ |
सोलापूर | १०४.२४ | ९०.७८ |
ठाणे | १०३.६४ | ९०.१६ |
वर्धा | १०४.३३ | ९०.८८ |
वाशिम | १०४.६८ | ९१.२२ |
यवतमाळ | १०४.४१ | ९०.९७ |
घरबसल्या चेक करा नवे दर :
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात…
भारतातील ‘या’ तिसऱ्या सर्वांत लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ऑफर सुरू :
दमदार ड्रायव्हिंग रेंज आणि चांगला टॉप स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यावर फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये खास डील सुरू आहे. TVS iQube ही भारतातील तिसरी सर्वांत लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी सध्या फ्लिपकार्टवर १,०७,२९९ रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट कंपनी iQube 2.2 kWh मॉडेलवर पाच हजार रुपयांहून अधिक सूट देत आहे. टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरवर EMI पर्यायांसह विविध सवलती मिळणार आहेत. बँके क्रेडिट कार्ड युजर्सना सहा हजार रुपयांपर्यंतची सूट आणि डेबिट कार्ड युजर्सना दोन हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एचडीएफसीसारख्या आघाडीच्या बँकांकडून मिळणाऱ्या ३६ महिन्यांपर्यंतच्या कर्जाच्या मुदतीसह तुम्ही EMI योजनादेखील निवडू शकता. या सगळ्या गोष्टी एकत्र करून, तुम्ही iQube 2.2 kWh कमीत कमी म्हणजे १,०१,९३४ रुपयांमध्ये घरी आणू शकता.