Petrol-Diesel Price in Maharashtra: सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे वेगेवेगळ्या कंपन्या देखील ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्सच्या गाड्या बाजारात उपलब्ध करून देतात. अशातच या दुचाकी, चारचाकीमध्ये काही इलेक्ट्रिक गाड्यांचा सुद्धा समावेश आहे. पण, आजही काही ग्राहक पेट्रोल व डिझेलच्या वाहने चालवण्यात पसंती दाखवतात. त्यामुळे सर्व सामन्यांचं लक्ष रोजच्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीकडे असते. तर आज नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे पेट्रोल व डिझेलचा भाव चला तर जाणून घेऊ या…

महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलचे (Petrol & Diesel ) नवे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.१६९०.७२
अमरावती१०४.७४९१.२८
औरंगाबाद१०५.२६९१.७५
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०४.४३९०.९५
बुलढाणा१०५.३२९१.८४
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.४५९०.९८
गडचिरोली१०४.९४९१.४८
गोंदिया१०५.४४९१.९५
हिंगोली१०५.१०९१.६३
जळगाव१०५.१४९१.६४
जालना१०५.६३९२.१०
कोल्हापूर१०४.६७९१.२१
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९९९०.५५
नांदेड१०६.१३९२.६२
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.३४९०.८६
उस्मानाबाद१०५.१२९१.६३
पालघर१०३.६९९०.२०
परभणी१०५.९४९२.४२
पुणे१०४.५३९१.०४
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.६१९२.११
सांगली१०४.४२९०.९७
सातारा१०४.७०९१.२३
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.८३९१.३६
ठाणे१०४.३१९०.८०
वर्धा१०४.७४९१.२८
वाशिम१०४.६८९०.८०
यवतमाळ१०५.२२९१.७३

महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे या शहरांत पेट्रोलची दरवाढ पाहायला मिळाली आहे. तर अकोला, बीड, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, सातारा या शहरांत पेट्रोलच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तर अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, पुणे, रायगड, रत्नागिरी या शहरांत डिझेलच्या किंमतीत किंचित दरवाढ तर अकोला बीड, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, उस्मानाबाद, पुणे, रत्नागिरी, रायगड आदी शहरात डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.

Petrol Diesel Price Today
Petrol-Diesel Price Today: सकाळ होताच महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर बदलले, मुंबई-पुण्यात सुरुये भाव 
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
18th August 2024 Petrol Diesel Rate
Petrol and Diesel Fresh Price: महाराष्ट्रात स्वस्त झालं का पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या रविवारचा तुमच्या शहरांतील इंधनाचा दर
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Ajit pawar and Jay Pawar
Baramati Jay Pawar: ‘बारामतीमधून निवडणूक लढण्यात रस नाही’, मुलगा जय पवारच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचे मोठं विधान

पेट्रोल व पॉवर पेट्रोलमधला फरक काय ? (Petrol Vs Power Petrol)

वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी आपणही कमी अधिक दिवसांच्या फरकाने पेट्रोल पंपाकडे फेरी मारत असाल. या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे पेट्रोल पाहायला मिळतात, एक म्हणजे नॉर्मल पेट्रोल आणि दुसरं म्हणजे पॉवर पेट्रोल. या दोघांचे भावही वेगवेगळे असतात. पॉवर पेट्रोल हे प्रीमियम इंधन आहे आणि त्यामध्ये नेहमीच्या पेट्रोलपेक्षा जास्त ऑक्टेन रेटिंग असते. सामान्य पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग सुमारे ८७ पर्यंत असते तर पॉवर पेट्रोलमध्ये ९१ ते ९४ पर्यंत असते. नेहमीच्या पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल अधिक महाग होण्याचे कारण म्हणजे त्याच्या उत्पादनाचा खर्च जास्त असतो.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवला जातात.