Fuel Price in Maharashtra: अनेक बाजूंनी महागाईचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्यास एकंदर महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासून घ्या

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२७९०.८०
अकोला१०४.०८९०.६५
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०४.९९९१.४८
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८८९२.३०
बुलढाणा१०४.८८९२.२२
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.७०९१.२२
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९०.८७
कोल्हापूर१०५.३६९१.८७
लातूर१०५.१९९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.६९९१.२६
उस्मानाबाद१०५.३३९१.३६
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.४१९३.७९
पुणे१०३.९३९०.४६
रायगड१०५.०३९०.२९
रत्नागिरी१०५.९३९२.०४
सांगली१०४.८८९०.५३
सातारा१०४.८८९१.२१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.८९९०.०३
वर्धा१०४.४५९०.४०
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०४.९५९१.४८

पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरवले जातात पाहा

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices on saturday 13 july 2024 in state maharashtra new rates of fuel pdb
Show comments