Fuel Price in Maharashtra:  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पेट्रोल डिझेलचा आहे याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी राज्यातील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याच्या तरतुदीचीही घोषणा केली. या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे  नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices on saturday 29 june 2024 in state maharashtra new rates of fuel pdb
First published on: 29-06-2024 at 10:29 IST