Fuel Price in Maharashtra: या नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर मिळाली आहे. आता व्यवसायिक गॅस सिलिंडरचा भाव कमी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनेक बाजूंनी महागाईचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्यास एकंदर महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. जर दुचाकी किंवा चारचाकी गाडीने तुम्ही दररोज प्रवास करत असाल. तर पहिल्यांदा घराबाहेर पडल्यानंतर आपण गाडीत पेट्रोल आणि डिझेल आहे का हे तपासून पाहतो. तसेच त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोलक-डिझेलचे दर तपासून घ्या…

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices on tuesday 2 july 2024 in state maharashtra new rates of fuel pdb
First published on: 02-07-2024 at 09:42 IST