Petrol Diesel Rates : आज २० सप्टेंबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमती बदल झालेला दिसत नाही आहे. मात्र महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल स्वस्त तर काही ठिकाणी डिझेल महाग मिळणार आहे. आज तुमच्या शहरातील परिस्थिती काय आहे? खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल-डिझेलचे ( Petrol & Diesel) दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३५९०.८७
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१०९१.६०
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.८८९१.४१
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०४.६१९१.१३
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.५९९२.०९
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.१४९१.६६
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.४७९१.०१
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०६.२४९२.७१
नंदुरबार१०४.१७९१.६७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.४१९२.८६
पुणे१०३.८८९०.४१
रायगड१०३.७८९०.२९
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४८९०.९४
सातारा१०५.०७९१.५६
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.९५९१.४८

देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार होत असल्याने सामान्य माणूस त्यात भरडला जात असतो. राष्ट्रीय तेल कंपन्यांना दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या सामान्य नागरिकांपर्यंत नवीन दर पाहायला मिळतात. जेणेकरून घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय असेल हे त्यांना समजू शकेल. पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल आणि डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या…

हेही वाचा…Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…

कार सुरू करताना काही लहान, पण महत्त्वाच्या सवयी इंजिन दीर्घकाळ उत्तम राहण्यासाठी मदत करतात…

कार सुरू केल्यानंतर सुमारे १०-२० सेकंदांसाठी तिला हळूवार चालवा. यामुळे इंजिन ऑइल इंजिनच्या सर्व भागांमध्ये योग्यरित्या पोहोचते, ज्यामुळे घर्षण कमी होते.कार सुरू करताना एसी, रेडिओ किंवा इतर गोष्टी बंद ठेवा, यामुळे बॅटरी आणि इंजिनवर अतिरिक्त दबाव पडत नाही.इंजिन सुरू केल्यानंतर, RPM ला स्थिर होऊ द्या. अचानक गती वाढल्याने इंजिनवर अनावश्यक भार पडू शकतो. कार सुरू केल्यानंतर इंजिनचा आवाज काळजीपूर्वक ऐका. काही असामान्य आवाज असल्यास कार लगेच तपासा.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.