Petrol Diesel Rates In Maharashtra : आज १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलण्यात येते. तर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. त्यानंतर दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Rates) नवीन दर जाहीर करतात. मग हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय आहे हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rates )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.११९०.४८
अकोला१०५.४२९०.६८
अमरावती१०५.४२९१.९३
औरंगाबाद१०५.३३९१.८२
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०५.५०९१.०३
बुलढाणा१०५.१५९१.६८
चंद्रपूर१०४.१०९०.६७
धुळे१०४.१६९०.७०
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.५०९२.०३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.३३९०.८८
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०५.२०९१.७०
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.५२९१.०१
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८२९०.३५
रायगड१०४.०३९०.५४
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.१४९०.७०
सातारा१०४.८८९१.४१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३७९०.९१
ठाणे१०३.७५९०.२६
वर्धा१०४.५०९१.०५
वाशिम१०४.९०९१.४३
यवतमाळ१०५.५०९२.०३

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती जाहीर केल्या जातात. तसेच व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील शहरांत दर किंचित कमी झाले आहेत.

एसएमएसद्वारे बघता येतील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates)

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

होंडाची आणखी एक पॉवरफुल ॲडव्हेंचर बाईक लाँच…

भारतात होंडाने एनएक्स २०० (Honda NX200) लाँच केली आहे. नवीन होंडा एनएक्स २०० ची किंमत १,६८,४९९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. Honda NX200 व्हेरियंटसह तीन रंग पर्याय सुद्धा ऑफर करते आहे, यामधे ॲथलेटिक ब्लू मेटॅलिक, रेडियंट रेड मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक आदींचा समावेश आहे. फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास Honda NX200 मध्ये रायडरला नेव्हिगेशन, कॉल नोटिफिकेशन्स आणि एसएमएस अलर्ट प्राप्त करण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि Honda RoadSync ॲपसह सुसंगत ४.२ इंचाचा पूर्ण-डिजिटल TFT डिस्प्ले आहे.

Story img Loader