कृषी अर्थशास्त्र विषयात काम करणाऱ्या तिघांना या वर्षीपासून फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.
उत्पादन मालावर आधारित शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने झटणारे राजस्थान येथील कार्यकत्रे रामपाल जाट, राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दादाभाऊ यादव व दैनिक ‘अॅग्रोवन’चे वृत्तसंपादक आनंद गाडे यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. मुंबई येथे १४ मे रोजी या पुरस्काराचे वितरण उमेशचंद्र सरंगी व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी असे पुरस्कार दिले जाणार असल्याचे पटेल यांनी जाहीर केले.
पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सुमारे १२ जिल्हय़ांतील शेतकरी संघटनेचे जुने कार्यकत्रे एकत्रित आले होते. गेल्या ३५ वर्षांपासून उत्पादनखर्च आधारित शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च व ५० टक्के नफा शेतकऱ्याला दिला जाईल, अशी घोषणा केली आहे. आता देणारे सरकार सत्तेवर येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना जे पदरात पडले पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीने मागण्या केल्या पाहिजेत. यासाठी जुनेजाणते कार्यकत्रे एकत्र आले असल्याचे पटेल यांनी सांगितले.
शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल धनवट, मराठवाडा अध्यक्ष कैलास पाटील तंवर, यशवंतराव तळेले, अमृत िशदे, माणिकराव गोरे, प्रदीप पाटील, देवीप्रसाद ढोबळे, दत्ता पाटील, कालिदास आपेट याप्रसंगी उपस्थित होते.
सरकारने शेतकऱ्यांचा हक्क डावलू नये
हमीभावापेक्षा कमी भावाच्या खरेदीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हरभऱ्याचा उत्पादनखर्च ३ हजार ७०० रुपये आहे तर हमीभाव ३ हजार १०० रुपये आहे. महाराष्ट्रात हरभऱ्याची खरेदी २ हजार २०० रुपयांपेक्षाही कमी दराने झाली. शेतकऱ्यांना फरकाची रक्कम सरकारने तातडीने दिली पाहिजे, अशी मागणी राजस्थान येथील शेतकरी नेते रामपाल जाट यांनी केली.
फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने तिघांना पुरस्कार
कृषी अर्थशास्त्र विषयात काम करणाऱ्या तिघांना या वर्षीपासून फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.
आणखी वाचा
First published on: 06-05-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phinix foundation award