निवडणूक आयोगाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत, यासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश देऊन ठाकरे बंधुंना प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ठाकरे बंधु निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या राजकीय पक्षाकडून निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांप्रमाणे त्यांनीदेखील स्वत:ची संपत्ती जाहीर केली पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे. ठाणे शहरातील श्रीप्रकाश नील यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत फक्त ठाकरे कुटुंबातील नावांचा समावेश असला तरी, सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असे म्हणण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे बंधुंना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत
निवडणूक आयोगाकडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत, यासाठी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.
First published on: 13-10-2014 at 09:48 IST
TOPICSपीआयएल
Web Title: Pil demands disclosure of assets by thackerays other leaders