िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा अध्यादेश येत्या आठवडय़ात काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली.
मुख्यमंत्री म्हणाले,‘‘राज्यात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत असून मुंबई, ठाणे व िपपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी वेगाने बांधकामे होत आहेत. नागरिक राहण्यासाठी घरे बांधतात, त्यातून अनधिकृत बांधकामे होतात. मात्र आता चिंता वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बांधकामांवर आता कुठेतरी नियंत्रण आणले पाहिजे.  अजित पवार यांचे मार्गदर्शन, ‘साहेबां’ चा दृष्टिकोन व चांगल्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे उत्कृष्ट शहर उभे राहिले, असे ते म्हणाले.

Story img Loader