जव्हार, मोखाडा तसेच वाडा तालुक्याच्या पूर्व भागात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंजाळ नदीला महापूर आला असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पीक, मलवाडा, पिंगेमान आदी गावातील नदीकडेच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. वाडा तालुक्यातील पाली
येथे असलेल्या सरकारी आश्रमशाळेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने गुरूवारी सायंकाळी सात वाजता या आश्रमशाळेतील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
पिंजाळ नदी मोखाडा, जव्हार, वाडा या तालुक्यातून वाहत असून गुरूवारी या तिन्ही तालुक्यात मुसळधार पाऊन झाल्याने या नदीला पुर आला आहे. पुराचे पाणी नदी काठच्या असलेल्या काही घरांमध्ये शिरले. तर नदी काठवर असलेल्या पाली येथील सरकारी आश्रम शाळेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाडा तहसीलदार दिलीप संखे, पाली आश्रमशाळेचे मुख्यध्यापक बी.बी. तुपे यांनी येथील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना याच गावात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये हलविले आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरी कुठेही जिवीतहानी झालेली नसल्याचे तहसीलदार संखे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा