कराड : पुणे- बंगळूरू महामार्गाच्या रुंदीकरण, सुसज्जीकरण कामात कराडमध्ये कोयना नदीवरील पुलाचे कॉलम फुटिंगसाठी चुकीच्या पध्दतीने मुरूम भराव केल्याने आणि अशातच पावसाच्या पाण्याची भर पडल्याने जलप्रवाहाच्या तडाख्यात कराड शहराला पाणी पुरवणारी जलवाहिनी फुटला आहे. त्यामुळे अचानक पाणी खंडित झाल्याने कराडकर पाण्यासाठी वणवण करीत आहेत.
हेही वाचा >>> भरत गोगावले हेच रायगडचे अदृश्य पालकमंत्री; पालकमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, कराडचा खंडित पाणी पुरवठा कधी सुरळीत होईल हे अनिश्चित असल्याने गोंधळाची स्थिती आहे. कराडकरांवरील हे जलसंकट गांभीर्याने स्थानिक आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतंत्रपणे यंत्रणेसमवेत पाहणी करून उपाय योजनांबाबत काय करता हे पाहिले आहे. खरेतर संबंधित यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान होताना, कराडमधील नागरिकांना पाण्यासाठी खटाटोप करावा लागत आहे. वेळप्रसंगी पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे.
हेही वाचा >>> Vishalgad : “कधी गडावर गेलात का? निधी दिलाय का?”, संभाजीराजेंचा मुश्रीफांवर पलटवार; सतेज पाटलांनाही प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी १६ एप्रिलला महामार्ग प्रशासन आणि महामार्गाच्या सुसज्जीकरण कामाच्या ठेकेदाराचे प्रतिनिधी प्रकल्प संचालकास सध्या ही दुर्घटना घडल्या ठिकाणचा भराव काढून घेणे उचित ठरेल, तरी तो काढून घेण्याच्या सुचना केल्या होता. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. आणि आणि त्याचाच परिणाम भरावाच्या मध्ये पाण्याचा प्रवाह वाढून कराडला पाणी पुरवठा करणारी वाहिनी वाहून गेली. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे अरिष्ट आज उभे राहिले आहे. त्यामुळे आता संबंधित दोषींवर सक्त कारवाईची मागणीही होवू लागले आहे. सध्या कराडकरांना टँकरने पाणी पुरवले जात असून, पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, लोकांची गैरसोय तत्काळ दूर व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सामाजिक संघटना व कार्यकर्ते सरसावले आहेत. डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने कृष्णा उद्योग समुहाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.