सांगलीतील तरुणाकडून एक पिस्तूल शुक्रवारी पोलिसांनी जप्त केले. या पिस्तुलाची किंमत १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय यशवंत लोंढे (वय ३४, रा. उत्तर शिवाजीनगर, बाल हनुमाननगर) हा संशयास्पद स्थितीमध्ये फिरत असताना गुन्हे अन्वेषण विभागाला आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल मिळून आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात झोपडपट्टी अतिक्रमण हटवत असताना दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Story img Loader