रायगड किल्ला संवर्धन प्राधिकणाचा उपक्रम 

असंख्य शिवभक्तांचा मेळा म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. अवघ्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर सध्या याच सोहोळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. तारखेप्रमाणे साजरा होणाऱ्या ३४५ व्याय  शिवराज्याभिषेक दिनी कायम स्वरुपी किल्ला प्लास्टीक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला  आहे. त्यापूर्वीच  शनिवारपासून (दि. २६ मे) किल्ल्याची स्व्च्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे .

िहदवी स्वराज्याच्या निर्मिती नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी म्हणून निवड केलेला रायगड किल्ला. रायगडाची धूळ एकदातरी मस्तकी लावावी ही प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा  असते . त्यामुळे शिवप्रभूंच्या व इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्वराज्याच्या राजधानीत वर्षांच्या बारा महीने शिवप्रेमींची मोठी गर्दी असते. शिवाय शिवराज्याभिषेक सोहळा किंवा शिवपुण्यतिथीला लाखो शिवभक्ति आवर्जून महाराजांच्या चरणी येत असतात परिणामी या ठिकाणी काही प्रमाणात कचरा देखील होत असतो . यापुढे रायगडावर कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही त्याच सोबत संपूर्ण किल्ला कायमस्वरुपी प्लास्टीक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार असून त्या प्रयत्नांना लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे .

६ जूनला शिवराज्यााभिषेक सोहळा आहे  तर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे . त्याचे औचित्य साधून संपूर्ण रायगड आणि त्याच्या परिसरातील गावे स्वच्छ आणि प्लास्टीकमक्त करण्यात येतील . यात ज्या ठिकाणी माणूस सहजासहजी पोहोचू शकत नाही  तेथे गिर्यारोहक तसेच साहसी पथकांची  मदत घेवून तेथील कचरा काढला जाणार आहे.

रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी ,मावळे हजारोंच्या संख्येने दाखल होतात संपूर्ण किल्ला भगवामय झाल्याचे चित्र पहायला मिळते. ठिकठिकाणी भगवे झेंडे, भगव्या पताका, तोरणे फुलांनी गड सजलेले असते पांरपारीक वेशभुषा,वाद्यांसह तुतारी आणि शंखनादाने वातावरण मंत्रमुग्ध बनते तर जय भवानी – जय शिवाजी च्या गजराने आसमंत दणाणून जातो . गडावरील पालखी सोहळा तर डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. यंदा ६ जुन रोजी पुन्हा तोच अनुभव. आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

किल्लेु रायगडावर सुरू असलेल्या् उत्खतननात सापडलेल्या शिवकालीन वास्तू पाहण्याची अनोखी संधी यावेळी शिवप्रेमींना मिळणार आहे . उत्खननात सापडलेल्या वस्तूंपकी काही औरंगाबाद येथे तर काही रायगडावर आहेत. या वस्तू किंवा अवशेष  नेमके कोणत्याकाळातील आहेत . यावर संशोधकांकडून अभ्यास केल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे किल्ले व रायगड संवर्धन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी दिली .

किल्ले रायगडावर सध्या  प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या संवर्धन कामाला वेग आला आहे . संभाजी राजे रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष झाल्यानंतर होणारा पहीलाच राज्याभिषेक सोहळा असल्याने यंदा उत्सवाची मोठी तयारी करण्यात येत आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा देखील साकारण्यात येणार असल्याने सर्वाचेच लक्ष यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याकडे लागले आहे.

‘शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांच्या समोर नेण्याचा आपला प्रयत्न असतो . राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण किंवा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा. हा आमचा प्रयत्न आहे . रायगड संवर्धन व विकास प्राधिकरणातर्फे यंदा शिवराज्याभिषेक दिनापूर्वी किल्ले् रायगडची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

त्यासाठी हायकर्स , रॅपलर्सची मदत घेतली जाणार आहे . किल्ले रायगड हा प्लास्टीकमुक्त व डस्टबीनमुक्त करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे . ’   – खासदार संभाजी राजे, अध्यक्ष किल्ले रायगड संवर्धन व विकास प्राधिकरण.

Story img Loader