संत तुकाराम ते चोखामेळापर्यंत सर्वच संतांनी समतेचा, परिवर्तनाचा हुंकार दिला. भक्तीमधून मुक्तिमार्ग सांगताना प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यावर हल्ला चढवत डोळस श्रद्धांचा व विवेकाचा मार्ग सांगितला. अशा संत तुकारामांची विचारगाथा देशाला कळावी,या विचाराने ज्येष्ठ दिग्दर्शक, राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, तसेच शाहीर संभाजी भगत यांनी ‘संत तुकाराम’ ही नाटय़कृती तयार करण्याचे ठरविले आहे. या नाटय़कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
बीड जिल्ह्य़ातील दरडवाडी (तालुका केज) येथील भारुड महोत्सवाच्या माध्यमातून ‘संत तुकाराम’ नाटय़कृतीची संकल्पना समोर आली. वास्तविक, या नाटय़कृतीविषयी वामन केंद्रे व संभाजी भगत यांनी यापूर्वीच मुहूर्तमेढ रोवली.
 संत तुकारामांचे व्यक्तिचित्रण व त्यांची विचारगाथा देशाला कळायची असेल, तर ‘संत तुकाराम’ िहदीत मांडावेत आणि त्यांना आंतरराष्ट्रीय रंगभूमी मिळवून द्यावी. एकटय़ाने ही वैचारिक चळवळ चालविण्याऐवजी त्याला व्यापकता द्यावी, हा हेतू आहे.
तुकारामांवरील नाटय़निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न प्राथमिक स्तरावर सुरू असून यातील संगीताचा भाग संभाजी भगत यांच्याकडे आहे. वामन केंद्रे सध्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे संचालक आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त संस्थेची सूत्रे हाती असल्याने ‘संत तुकाराम’ ही नाटय़कृती सर्वदूर पोहोचवली जाऊ शकते, हा भगत यांचा विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा