वनराज्यमंत्री भास्कर जाधव दोषारोपांची नोटीस बजावलेल्या अधिकाऱ्याला केडर डावलून विभागीय वनाधिकाऱ्याना उपवनसंरक्षक पदावर बसविण्यास अनुकूल असल्याची तक्रार अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे तालुकाध्यक्ष जयंत बरेगार यांनी केली आहे. या संदर्भात एक पत्रकच जयंत बरेगार यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आपण मुंबई उच्च न्यायालयात सिव्हिल अर्ज १ एप्रिल २०१३ रोजी केला आहे. तसेच सिंधुदुर्गातील वनअधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचे म्हटले आहे. सध्या चिपळूण येथे साहाय्यक वनसंरक्षक म्हणून नेमणुकीस असणारे रणजीतसिंग राणे यांना मंत्री ना. जाधव उपवनसंरक्षक पदाची बढती केडर डावलून देत आहेत. तसे त्यांनी शिफारसपत्र दिल्याचे बरेगार यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेत दाखल केलेल्या बहुतेक प्रकरणात राणे यांचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक म्हणून रणजीतसिंग राणे यांची नेमणूक झाल्यास तो चौकशीत अडथळे निर्माण करून पुरावा नष्ट करण्याची शक्यता जयंत बरेगार यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे. रणजीतसिंग राणे यांच्या झोन बदलीसाठी राज्यमंत्री भास्कर जाधव यांची तळमळ पाहता त्यांनी केडर बदलून पोस्ट देण्यासाठी चालविलेल्या खटपटीकडे जयंत बरेगार यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी केडर बदलीवर आक्षेप नोंदविला आहे.

Story img Loader