पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर असून त्यांनी निळवंडे धरणाचं जलपूजन केलं आहे. यानंतर त्यांनी शिर्डी येथील ‘शेतकरी महासन्मान मेळावा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना संबोधित केलं आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

शेतकऱ्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही खरी नियत ठेवून शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.”

Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Register a case against Manoj Jarange Patil, protesters demand outside Shivajinagar police station in Pune
“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी

हेही वाचा- “मराठा समाजाची मागणी चुकीची…”; भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत, सदावर्तेंनाही दिला सल्ला

“२०१४ च्या आधी तेलबियांची आणि कडधान्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ५०० ते ६०० कोटींची उत्पादने एमएसपीवर खरेदी केली जात होती. पण आमच्या सरकारने तेलबिया आणि कडधान्यांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १ लाख १५ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. ते (शरद पवार) जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना स्वत:च्या पैशांसाठीही दलालांच्या भरवशावर राहावं लागत होतं. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली,” असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

हेही वाचा- “बाबा महाराज सातारकर यांचं कार्य प्रेरणादायी कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ शब्दांत वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अलीकडेच आमच्या सरकारने रबी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली आहे. चणा पिकासाठी १०५ रुपये तर गहू आणि कुसूम पिकांसाठी एमएसपीमध्ये १५० रुपयांची वाढ केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप लाभ होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही आम्ही चांगल्याप्रकारे काळजी घेत आहोत. सरकारने गेल्या ९ वर्षांत ७० हजार कोटी रुपयांचं इथेनॉल खरेदी केलं आहे. हा सर्व पैसाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.”

Story img Loader