पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार, यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमावर भाष्य केलं आहे. शरद पवारांची भूमिका वादग्रस्त वाटत असली तरी त्यातून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, असा समज कुणाचा असेल तर तो गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?

हेही वाचा- “दगडूशेठ पहिली व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर…”, नरेंद्र मोदींचं पुण्यात वक्तव्य

विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले, “शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं, याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी खूप आधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. त्यांनी स्वत: या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेतली. त्यामुळे ते या कार्यक्रमाला जातील. पण शरद पवारांनी हे टाळायला हवं, अशी जनभावना आहे. शेवटी तो शरद पवारांचा निर्णय आहे. यामुळे महाविकास आघाडीत काही फरक पडेल, असं मला अजिबात वाटत नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे.”

हेही वाचा- “नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच…”, अजित पवारांकडून स्तुतीसुमनं

“निवडणुकीपूर्वी आलेले सर्व सर्व्हे पूर्णत: महाविकास आघाडीच्या बाजुने आहेत. जनमानस बदलत आहे. कोणालाही अशा अभद्र युत्या आणि पक्ष फोडणं मान्य नाही. अशा स्थितीत शरद पवारांची आताची भूमिका नक्कीच वादग्रस्त वाटत असली तरी त्यातून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, असा कुणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे, एवढंच मी सांगू इच्छितो”, असंही व[टीवार म्हणाले.

Story img Loader