Maharashtra Breaking News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…

Live Updates

Maharashtra Marathi News Live Today,12 January 2024 : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर...

19:06 (IST) 12 Jan 2024
पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर, थेट नेत्यांची नाव घेत म्हणाल्या....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याची टीका केली होती. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. "पंतप्रधान मोदी पद आणि वयाने मोठे आहेत. पण, अमित शाहांनी आम्हाला उद्देशून म्हणाले होते की, 'एक बोट माझ्याकडे दाखवता, तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात.' पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर किती घराणेशाही असलेली नेते होते? मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा राजकारणात आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारती पवार, छगन भुजबळ यांच्यातही घराणेशाही आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

18:23 (IST) 12 Jan 2024
"१० वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, पण...", मोदींचं विधान

"२०१४ च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होता. तेव्हा काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघत आहे. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षात भारत बदलला आहे, याची चर्चा होत आहे. १० वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. मात्र, आता प्रकल्पाची चर्चा होत आहे," असंही मोदींनी म्हटलं.

18:08 (IST) 12 Jan 2024
"वंदे भारत रेल्वे मुळे नागरिकांचा प्रवास सुखकर"

"नवी मुंबई कोस्टल रोडचं काम वेगात सुरू आहे. देशात अनेक एक्स्प्रेसवे बनत आहेत. वंदे भारत रेल्वे मुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे," असं मोदींनी म्हटलं.

18:01 (IST) 12 Jan 2024
'अटल सेतू' प्रकल्पासाठी मोदींनी मानले जपान सरकारचे आभार; म्हणाले...

"अटल सेतू बनवण्यासाठी जपान सरकारनं योगदान दिलं. त्यासाठी मी जपान सरकारचं आभार मानतो. अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प माजी पंतप्रधान शिंझो अॅबे आणि मी घेतला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणं ही मोठी उपलब्धी आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे," असं मोदींनी सांगितलं.

17:56 (IST) 12 Jan 2024
"शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांच्या नेतृत्वात...", पंतप्रधान मोदींचं विधान

"आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकासित भारतासाठी महत्वाचा आहे. देशाचा विकास होणार, ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचं आज लोकार्पण करण्यात आलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास सुरू आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबईत म्हटलं आहे.

17:50 (IST) 12 Jan 2024
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी कोल्हापुरात मनसेचे बेमुदत उपोषण सुरू

कोल्हापूर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी मनसेने शुक्रवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

17:49 (IST) 12 Jan 2024
सांगली : वीजबिल घोटाळ्याचा चौकशी अहवाल ९ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश

सांगली : महापालिकेच्या वीज बिलातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तातडीने विशेष चौकशी समिती नियुक्त करून ९ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्तांनी शुक्रवारी सुनावणीवेळी दिले.

17:29 (IST) 12 Jan 2024
राजारामबापू पुतळा अनावरणसाठी मंगळवारी शरद पवार सांगलीत

सांगली : लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी शुक्रवारी दिली. सांगलीतील स्टेशन चौक या ठिकाणी राजकारण, समाजकारण, शिक्षण व शेती क्षेत्रात उेखनीय कार्य केलेले लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

17:24 (IST) 12 Jan 2024
सांगली : महायुतीतील घटक पक्ष कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा रविवार दि. १४ जानेवारी रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक व भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

17:19 (IST) 12 Jan 2024
लोकसभा निवडणुकीनंतर भूकंप येणार, विरोधक तो सहन करू शकणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अटल सागरी सेतू भूकंपातही सुरक्षित राहिल, इतका मजबूत आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर भूकंप येईल आणि आमचे विरोधक तो सहन करू शकणार नाहीत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

17:11 (IST) 12 Jan 2024
फ्लेमिंगोची संख्या वाढली - देवेंद्र फडणवीस

फ्लेमिंगो अभयारण्य जवळच असल्यामुळे या सेतूचा त्यावर परिणाम होईल, असे सांगितले गेले. पण आता फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे.

17:07 (IST) 12 Jan 2024
विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी उरणमध्ये दाखल

न्हावा-शेवा अटल सेतूचे उदघाटन केल्यानंतर विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी उरणमध्ये दाखल झाले आहेत. इथे जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1745765971116331024

16:41 (IST) 12 Jan 2024
रिकाम्या शहाळ्यांपासून आकर्षक भेटवस्तू, वसई विरार महापालिकेची अनोखी संकल्पना

वसई - वसई विरार महापालिकेने रिकाम्या शहाळ्यांपासून अनोख्या पद्धतीने आकर्षक भेटवस्तू तयार केली आहे. या शहाळ्यांना बाहेरून रंगवून आत माती आणि रोप टाकून ही भेटवस्तू तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे नैसर्गिक भेटवस्तू तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. याशिवाय पालिकेच्या कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत ही नैसर्गिक भेटवस्तू देऊन केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 12 Jan 2024
धाराशिव : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू, महायुतीच्या जिल्हा समन्वय समितीचे गठण

धाराशिव - महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित समावून घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीचे गठण करण्यात आले आहे. दर आठवड्याला या समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सर्वजण मिळून कामाला लागलो आहोत. त्यासाठी रविवार, १४ जानेवारी रोजी स्वस्तीक मंगल कार्यालय येथे दुपारी १ वाजता महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

16:01 (IST) 12 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'अटल सागरी सेतू'चं लोकार्पण

मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजे अटक बिराही वाजपेयी स्मृती न्वावाशिवा 'अटल सेतू'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

https://twitter.com/ANI/status/1745755162231361905

15:29 (IST) 12 Jan 2024
"मिंध्यांना निमंत्रण अन्...", ठाकरे गटातील खासदाराची शिंदे सरकारवर टीका

"अटल सेतूची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अनेकवेळा पाहणी केली आहे. आता तेच सरकारला खुपतं. त्यामुळे दुखतं तिथे खुपतं. म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं नाही. जेवढे मिंधे त्यांना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही, असा त्याचा अर्थ," अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे.

15:25 (IST) 12 Jan 2024
वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, २०२३ मध्ये १९ बोगस डॉक्टरांवर कारवाई

वसई- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०२३ मध्ये एकूण १९ बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यातील अनेक डॉक्टर्स हे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, दुसर्‍याच्या नावावर तसेच मान्यता नसताना ॲलोपॅथी दवाखाना चालवत होते.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 12 Jan 2024
मुंबई : उद्वाहनासह पहिला पादचारी पूल कांदिवलीमध्ये!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे पादचारी पूल बांधला जाणार असून या पुलाला जिने, सरकते जिने आणि प्रथमच उद्वाहनाची सोयही असणार आहे. या पुलासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पादचारी पूल तयार झाल्यामुळे किमान पंचवीस हजार पादचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 12 Jan 2024
ठाणे : खडी यंत्रात पडून मजुराचा मृत्यू

ठाणे : घोडबंदर येथील नागलाबंदर भागात खडी यंत्रामध्ये पडून भलबद्र यादव (४०) या मजुराचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा साधने पुरविली नसल्याप्रकरणी खडी यंत्र मालकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 12 Jan 2024
पुण्यातील महायुती मेळाव्यात अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणता सल्ला देणार ?

पुणे : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजवर भाजपला ‘कमळाबाई’ असे हिणवणारे अजित पवार हे या मेळाव्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शाळा घेत मोलाचा उपदेश करणार आहेत.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 12 Jan 2024
अटल सेतूच्या शुभारंभाला रामाचा नारा, विकास प्रकल्पातून महायुतीची हिंदुत्वाची पेरणी

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने आणि विशेषत: भाजपने हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा...

14:59 (IST) 12 Jan 2024
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कधी नव्हे ते शक्य झालं…नवी मुंबई शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाचा आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई दौऱ्यामुळे नवी मुंबईसह मुंबई महानगरपट्ट्यातील प्रवासी शुक्रवारी कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद घेत आहेत.

वाचा सविस्तर...

14:29 (IST) 12 Jan 2024
आता टाटा समूह थेट नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर, ‘ही’ कंपनी खरेदी करणार

कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ यांसारख्या ब्रँडचे मालक आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक इंडिया ग्रीन टीसारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.

सविस्तर वृत्त

13:56 (IST) 12 Jan 2024
"घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान", मोदींचा हल्लाबोल

"भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरूणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढंच देशाचं भविष्य चांगलं असेल. तरूण सक्रिय राजकारणात आले, तर घराणेशाहीच्या राजकारण कमी होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे," असा हल्लाबोलही मोदींनी विरोधकांवर केला आहे.

13:48 (IST) 12 Jan 2024
"अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे"

"चांद्रयान, आदित्य एल-१ चे यश जगासमोर आहे. भारतातील प्रत्येक दुकानसमोर युपीआय आहे. अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे. येत्या काळात असं काम करा की येणाऱ्या पिढ्या तुमचं नाव घेतील," असं मोदींनी म्हटलं.

13:45 (IST) 12 Jan 2024
चारशेपेक्षा अधिक बसमधून राज्यातील विविध ठिकाणांहून महिला सभेस्थळी दाखल

पनवेल : १२०० पेक्षा अधिक बसगाड्या उभ्या राहतील एवढी वाहनक्षमता असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या वाहनतळामध्ये दुपारी बारावाजेपर्यंत चारशेहून अधिक बसगाड्या दाखल झाल्या होत्या. उन्हाचे प्रमाण अधिक असले तरी यावेळी वाहनातून उतरल्यावर सार्वजनिक शौचालय आणि विश्रामाची विशेष सोय आयोजकांच्यावतीने करण्यात आल्याचे दिसले. वाहनतळापासून सुमारे सव्वा ते दिड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असल्याने सभेसाठी आलेल्या महिला व पुरुषांना काही मिनिटांची पायपीट करावी लागत होती.

13:44 (IST) 12 Jan 2024
"सरकारनं १० वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या"

"युवाकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल. सरकारनं १० वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरूणांवर सर्वाधिक विश्वास आहे," असं मोदी म्हणाले.

13:44 (IST) 12 Jan 2024
"वीरांनी देशाला नवी दिशा दिली"

"आजही शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांची देश आठवण करतो. ते देशासाठी लढले आणि देशासाठी स्वप्न पाहिली. याच वीरांनी देशाला नवी दिशा दिली," असं मोदींनी सांगितलं.

13:43 (IST) 12 Jan 2024
"भारत हे उत्पादनांचे हब झालं आहे"

"भारतातील युवकांमध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. भारत हे उत्पादनांचे हब झालं आहे," असं मोदींनी म्हटलं आहे.

13:35 (IST) 12 Jan 2024
पंतप्रधानांकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, मराठीतून भाषण करत म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केलं. यावेळी सुरूवातीलाच पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यावेळी पंतप्रधानांनी मराठीतून भाषण करत राजमाता माँ जिजाऊ साहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीर भूमित येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी माँ जिजाऊ साहेबांना कोटी कोटी वंदन करतो. माँ जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं," असं पंतप्रधानांनी म्हटलं.

devendra fadnavis vs uddhav thackeray

<br />"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वाघ होते. त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते?" असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader