Maharashtra Breaking News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Marathi News Live Today,12 January 2024 : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याची टीका केली होती. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. “पंतप्रधान मोदी पद आणि वयाने मोठे आहेत. पण, अमित शाहांनी आम्हाला उद्देशून म्हणाले होते की, ‘एक बोट माझ्याकडे दाखवता, तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात.’ पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर किती घराणेशाही असलेली नेते होते? मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा राजकारणात आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारती पवार, छगन भुजबळ यांच्यातही घराणेशाही आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“२०१४ च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होता. तेव्हा काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघत आहे. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षात भारत बदलला आहे, याची चर्चा होत आहे. १० वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. मात्र, आता प्रकल्पाची चर्चा होत आहे,” असंही मोदींनी म्हटलं.
“नवी मुंबई कोस्टल रोडचं काम वेगात सुरू आहे. देशात अनेक एक्स्प्रेसवे बनत आहेत. वंदे भारत रेल्वे मुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे,” असं मोदींनी म्हटलं.
“अटल सेतू बनवण्यासाठी जपान सरकारनं योगदान दिलं. त्यासाठी मी जपान सरकारचं आभार मानतो. अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प माजी पंतप्रधान शिंझो अॅबे आणि मी घेतला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणं ही मोठी उपलब्धी आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे,” असं मोदींनी सांगितलं.
“आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकासित भारतासाठी महत्वाचा आहे. देशाचा विकास होणार, ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचं आज लोकार्पण करण्यात आलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास सुरू आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबईत म्हटलं आहे.
कोल्हापूर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी मनसेने शुक्रवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सांगली : महापालिकेच्या वीज बिलातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तातडीने विशेष चौकशी समिती नियुक्त करून ९ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्तांनी शुक्रवारी सुनावणीवेळी दिले.
सांगली : लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी शुक्रवारी दिली. सांगलीतील स्टेशन चौक या ठिकाणी राजकारण, समाजकारण, शिक्षण व शेती क्षेत्रात उेखनीय कार्य केलेले लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकार्यांचा मेळावा रविवार दि. १४ जानेवारी रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक व भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
अटल सागरी सेतू भूकंपातही सुरक्षित राहिल, इतका मजबूत आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर भूकंप येईल आणि आमचे विरोधक तो सहन करू शकणार नाहीत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
फ्लेमिंगो अभयारण्य जवळच असल्यामुळे या सेतूचा त्यावर परिणाम होईल, असे सांगितले गेले. पण आता फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे.
न्हावा-शेवा अटल सेतूचे उदघाटन केल्यानंतर विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी उरणमध्ये दाखल झाले आहेत. इथे जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.
? 4.40pm | 12-1-2024 ? Navi Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 12, 2024
LIVE | Laying of Foundation Stone and Inauguration of various projects at the hands of Hon. PM Narendra Modi ji@narendramodi#NarendraModi #Maharashtra #NaviMumbai #MumbaiGetsAtalSetu #Development https://t.co/eHzRDg9OZ8
वसई – वसई विरार महापालिकेने रिकाम्या शहाळ्यांपासून अनोख्या पद्धतीने आकर्षक भेटवस्तू तयार केली आहे. या शहाळ्यांना बाहेरून रंगवून आत माती आणि रोप टाकून ही भेटवस्तू तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे नैसर्गिक भेटवस्तू तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. याशिवाय पालिकेच्या कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत ही नैसर्गिक भेटवस्तू देऊन केली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.
धाराशिव – महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित समावून घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीचे गठण करण्यात आले आहे. दर आठवड्याला या समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सर्वजण मिळून कामाला लागलो आहोत. त्यासाठी रविवार, १४ जानेवारी रोजी स्वस्तीक मंगल कार्यालय येथे दुपारी १ वाजता महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजे अटक बिराही वाजपेयी स्मृती न्वावाशिवा ‘अटल सेतू’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
#WATCH | PM Modi inaugurates Atal Bihari Vajpayee Sewari – Nhava Sheva Atal Setu in Maharashtra
— ANI (@ANI) January 12, 2024
Atal Setu is the longest bridge in India and also the longest sea bridge in the country. It will provide faster connectivity to Mumbai International Airport and Navi Mumbai… pic.twitter.com/2GT2OUkVnC
“अटल सेतूची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अनेकवेळा पाहणी केली आहे. आता तेच सरकारला खुपतं. त्यामुळे दुखतं तिथे खुपतं. म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं नाही. जेवढे मिंधे त्यांना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही, असा त्याचा अर्थ,” अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे.
वसई- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०२३ मध्ये एकूण १९ बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यातील अनेक डॉक्टर्स हे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, दुसर्याच्या नावावर तसेच मान्यता नसताना ॲलोपॅथी दवाखाना चालवत होते.
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे पादचारी पूल बांधला जाणार असून या पुलाला जिने, सरकते जिने आणि प्रथमच उद्वाहनाची सोयही असणार आहे. या पुलासाठी ६ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पादचारी पूल तयार झाल्यामुळे किमान पंचवीस हजार पादचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
ठाणे : घोडबंदर येथील नागलाबंदर भागात खडी यंत्रामध्ये पडून भलबद्र यादव (४०) या मजुराचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा साधने पुरविली नसल्याप्रकरणी खडी यंत्र मालकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजवर भाजपला ‘कमळाबाई’ असे हिणवणारे अजित पवार हे या मेळाव्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शाळा घेत मोलाचा उपदेश करणार आहेत.
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारने आणि विशेषत: भाजपने हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचे दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई दौऱ्यामुळे नवी मुंबईसह मुंबई महानगरपट्ट्यातील प्रवासी शुक्रवारी कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद घेत आहेत.
कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ यांसारख्या ब्रँडचे मालक आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक इंडिया ग्रीन टीसारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.
“भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरूणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढंच देशाचं भविष्य चांगलं असेल. तरूण सक्रिय राजकारणात आले, तर घराणेशाहीच्या राजकारण कमी होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे,” असा हल्लाबोलही मोदींनी विरोधकांवर केला आहे.
“चांद्रयान, आदित्य एल-१ चे यश जगासमोर आहे. भारतातील प्रत्येक दुकानसमोर युपीआय आहे. अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे. येत्या काळात असं काम करा की येणाऱ्या पिढ्या तुमचं नाव घेतील,” असं मोदींनी म्हटलं.
पनवेल : १२०० पेक्षा अधिक बसगाड्या उभ्या राहतील एवढी वाहनक्षमता असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या वाहनतळामध्ये दुपारी बारावाजेपर्यंत चारशेहून अधिक बसगाड्या दाखल झाल्या होत्या. उन्हाचे प्रमाण अधिक असले तरी यावेळी वाहनातून उतरल्यावर सार्वजनिक शौचालय आणि विश्रामाची विशेष सोय आयोजकांच्यावतीने करण्यात आल्याचे दिसले. वाहनतळापासून सुमारे सव्वा ते दिड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असल्याने सभेसाठी आलेल्या महिला व पुरुषांना काही मिनिटांची पायपीट करावी लागत होती.
“युवाकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल. सरकारनं १० वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरूणांवर सर्वाधिक विश्वास आहे,” असं मोदी म्हणाले.
“आजही शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांची देश आठवण करतो. ते देशासाठी लढले आणि देशासाठी स्वप्न पाहिली. याच वीरांनी देशाला नवी दिशा दिली,” असं मोदींनी सांगितलं.
“भारतातील युवकांमध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. भारत हे उत्पादनांचे हब झालं आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित केलं. यावेळी सुरूवातीलाच पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यावेळी पंतप्रधानांनी मराठीतून भाषण करत राजमाता माँ जिजाऊ साहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीर भूमित येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी माँ जिजाऊ साहेबांना कोटी कोटी वंदन करतो. माँ जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं,” असं पंतप्रधानांनी म्हटलं.