Maharashtra Breaking News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Marathi News Live Today,12 January 2024 : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…
भाईंदर :- ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटाचे कलावंत, निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंताविरोधात मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सव सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मल्लखांबांची प्रात्यक्षिक करण्यात आली. तसेच, नाशिक ढोलचा ताल, युवकांची परेड आणि थरारक अशी प्रात्यक्षिकही करण्यात आली.
उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटन होणाऱ्या बहुप्रतिक्षित उरण – खारकोपर लोकलच्या उदघटनाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उरण स्थानकांत हा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी स्थानकाची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली आहे.
निफ्टी शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास ५० पैकी २८ शेअर्स वाढताना दिसत आहेत आणि २२ शेअर्स घसरणीसह व्यवहार करीत आहेत. निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या समभागांमध्ये इन्फोसिस ७.६३ टक्क्यांनी वर आहे.
“नाशिकच्या पावनभूमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी नाशिकमधील पावत्र भूमित आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे. अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि करोडो नागरिकांचं होतं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आहे. मोदी है तो मुमकीन है… पंतप्रधान लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव सोहळ्यात बोलताना म्हटलं.
ज्योती CNC ऑटोमेशनने IPO द्वारे १ हजार कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने प्रति शेअर ३१५ ते ३३१ रुपये किमतीचा पट्टा निश्चित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना शाल, फेटा बांधून, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्कार केला आहे.
नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन होत असून महोत्सवासाठी होणारी गर्दी पाहता आरोग्यविषयक दक्षता आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमांच्या स्थळी आरोग्यविषयक सुविधा देण्यात येणार आहेत.
महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून आठ हजारांहून अधिक विद्यार्थी नाशिकमध्ये येत आहेत. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना आरोग्यविषयक समस्या उदभवल्यास वैद्यकीय सेवा त्वरीत मिळावी, म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. तपोवन मैदान, महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, हनुमान नगरातील युवा ग्राम, उदोजी मराठा बोर्डिंगजवळील परिसर यासह अन्य ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सर्व ठिकाणी नाशिक महानगरपालिका, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेसह काही खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी तानाजी सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमांच्या ठिकाणी येणाऱ्यांची करोनाविषयक आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमस्थळी दोन खाटा, वैद्यकीय अधिकारी, औषधे, निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग, रुग्णवाहिका अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी खासगी रुग्णालयाची मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय हेलिपॅड परिसरात कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. अन्य ठिकाणीही रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. आठही ठिकाणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालये, खासगी रुग्णालयात संबंधितांना दाखल करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सवातील कार्यक्रमांच्या प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था. प्रत्येक कार्यक्रमस्थळी दोन खाटा, वैद्यकीय अधिकारी, औषधे, निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग, रुग्णवाहिका. खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय हेलिपॅड परिसरात कार्डियाक रुग्णवाहिका, अन्य ठिकाणीही रुग्णवाहिकांची व्यवस्था.
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन आणि जाहीर सभेनिमित्त सकाळी साडेदहाच्या सुमारास आगमन झाल्यावर पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकापासून त्यांनी रोड शो केला. या रोड शोप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नाशिकरांनी त्यांचे फुले उधळून आणि जय श्रीरामचा नारा देत स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं आहे. यानंतर मोदींनी वारकऱ्यांसह भजन केलं आहे.
VIDEO | PM @narendramodi sings 'bhajan' at Shree Kalaram Temple in #Nashik, Maharashtra. pic.twitter.com/F4dsLI0hj0
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2024

नवी मुंबई : शिवडी नाव्हाशेवा अटल सेतूच्या शुभारंभसाठी नवी मुंबईत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महायुतीतील भाजप शिवसेना या दोन पक्षांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शनाची तयारी केल्याचे दिसून येत आहे. अटल सेतूचं नवी मुंबईचा टोक असलेल्या शिरले नाका ते नवी मुंबई विमानतळा मार्गावर पंतप्रधानाच्या स्वागतासाठी जागी जागी जय श्री रामाचे लावलेले फलक लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली. नाशिककरांच्या वतीनं चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जलपूजन करण्यात आलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी गोदावरी तिरी आरतीही केली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी शुक्रवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागताला ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्र असणारा आगरी-कोळी समाजातील पारंपारिक पद्धतीचा साज चढविला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला नाशिकमध्ये सुरूवात झाली आहे. या रोड शोला नागरिकांचा प्रचंड गर्दी झाली आहे. यावेळी नागरिकांकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही पंतप्रधानांसह उपस्थित आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds a roadshow in Nashik, Maharashtra. He will offer prayers at the Shree Kalaram Mandir here in the city and attend the National Youth Festival. pic.twitter.com/6shEKMumqJ
— ANI (@ANI) January 12, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील तपोवन मैदानात शुक्रवारी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त जाहीर सभा, रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदाघाटावर आरती असे मोदी यांचे कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान भेट देणाऱ्या रामकुंड परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. पहिल्या दिवसाच्या या कार्यक्रमापासून १५ जानेवारीपर्यंत शहरात विविध ठिकाणी महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजर झाले आहेत.
अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीमुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती मार्ग, आणि जुना मुंबई पुणे महामार्गावरून नवी मुंबईत येणाऱ्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे बंदी आदेश लागू असणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला असून वाहतूक सेवेसाठी सज्ज झाला आहे. या सागरी सेतूचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटल सेतूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या अटल सेतूची वैशिष्ट्ये विषद केली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १२ जानेवारी रोजी नाशिकला येणार आहे. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. तसंच, उद्याच पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईतही येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्याचा दौरा कसा असेल याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी सविस्तर माहिती दिली.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन होत असून महोत्सवासाठी होणारी गर्दी पाहता आरोग्यविषयक दक्षता आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमांच्या स्थळी आरोग्यविषयक सुविधा देण्यात येणार आहेत.
महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून आठ हजारांहून अधिक विद्यार्थी नाशिकमध्ये येत आहेत. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना आरोग्यविषयक समस्या उदभवल्यास वैद्यकीय सेवा त्वरीत मिळावी, म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. तपोवन मैदान, महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, हनुमान नगरातील युवा ग्राम, उदोजी मराठा बोर्डिंगजवळील परिसर यासह अन्य ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सर्व ठिकाणी नाशिक महानगरपालिका, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेसह काही खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी तानाजी सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमांच्या ठिकाणी येणाऱ्यांची करोनाविषयक आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाचा इशारा देणाऱ्या शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावत संबंधितांवर करडी नजर ठेवली आहे. काहींना ताब्यात घेतल्याची तक्रार केली जात आहे.
शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी ( १० जानेवारी ) दिला. तसेच, ‘शिवसेने’चे सारेच आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारल्यावर संतापल्याचं पाहायला मिळाले.
महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळय़ात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ’दाम’शास्त्र्यांचा नाही, अशी टीका ठाकरे गटानं ‘सामना’ अग्रलेखातून राहुल नार्वेकरांवर केली आहे.
“देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत, असं भाजपाला वाटत असावे. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील. कार सेवकांच्या रक्तातून, बलिदानातून किंवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालातून राम मंदिर उभे राहिलं नाही, असं भाजपाला वाटत असावं. पण, शेवटी प्रभू श्री रामाच्या नावानं भाजपा कितीवेळ राजकारण करणार? कुठेतरी त्याला पूर्णविराम मिळाला पाहिजे,” असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.