Narendra Modi Maharashtra Visit Live, 19 January 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे रणशिंगही फुकले.
Maharashtra News, Narendra Modi Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडेकोट सुरक्षा
पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे.
कराड : पुणे – बंगळुरू महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारासमोरील आणि मलकापूरच्या हद्दीतील पादचारी उड्डाणपुलास आकाराने उंच स्वरुपाचा कंटेनर जोराने धडकून अडकल्याने काही काळ वाहतूक खोळांबली होती. ही घटना आज गुरुवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
नाशिक – देवळाली गावात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटाचे समर्थक तलवारी, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन परस्परांच्या अंगावर धाऊन गेले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिचे माजी सचिव प्रकाश जाजू यांच्याविरुद्ध २००८ मध्ये धमकावणे आणि विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. वाद परस्पर सामंजस्याने सोडवल्याचे आणि प्रकरण पुढे नेण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने जाजू यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.
मुंबई : मुलुंड आणि ठाण्यातील काही भागांतील नागरिकांना २० जानेवारीपासून पुढचे काही दिवस शुद्धीकरण प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. या जलबोगद्याची दुरुस्ती शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.
जेजुरी : कोणी उठायचे आणि आपला इतिहास कसाही तोडायचा-मोडायचा, एखादे वक्तव्य करायचे, सध्या ही ‘फॅशन’ झाली आहे. पण, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. खरा इतिहास बाजूला ठेवल्यामुळे नंतर त्याचा उद्रेक होतो. जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत हसावे की डोके फोडून घ्यावे हे समजेना, केवळ चर्चेत राहण्यासाठीच अशी वक्तव्य केली जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे हिंदू बांधवांमध्ये भीती निर्माण होऊ लागल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. देव-देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
डोंबिवली – येथील पश्चिम भागातील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी पहाटे चोरट्यांनी दोन सराफा दुकानांत चोरी करून लाखो रुपयांचा सोने, चांदीचा ऐवज लुटून नेला. पळून जाताना चोरट्यांनी आपला थांगपत्ता लागू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर नेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे लोकार्पण केलं असून ते आता गुंदवली मेट्रो स्थानकात दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ते मेट्रोने प्रवासही करणार आहेत.
सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी उमेदवारी दाखल करून राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला आहे. आ. पाटील यांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८५ मध्ये कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊनच केली होती.
मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मुंबईचा विकास गतीने होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुणे : मूलबाळ होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच, पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडाची पावडर खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात उघडकीस आला आहे.
आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटीं रुपायांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. यापूर्वी देशात फक्त गरिबीवर चर्चा करत वेळ काढला जायचा, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली आहे. भारत आपल्या सामर्थ्यांच्या योग्य वापर करत आहे. भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर भारत पहिल्यांदाच मोठी स्वप्न बघतो आहे. असेही ते म्हणाले.
पुणेः स्वतंत्र भारत पार्टीने जाहीर केलेल्या सेबीच्या कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतीमालावर घातलेल्या वायदेबंदीला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी २३ जानेवारी रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांचं दुकान लवकरच बंद होईल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा आहे. राज्यात आज सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचं नातं होतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. अनेकांनी इच्छा होती, या कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये, मात्र, नियतीपुढे कोणाचंही चालत नाही, असेही ते म्हणाले.
पुणे : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजे, महानंदची पंचवार्षिक निवडणूक अपवाद वगळता बिनविरोधच झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असतानाही सरकारी पातळीवरून मदत व्हावी आणि महानंद अडचणीतून बाहरे यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महानंदची सर्व सूत्रे दिली होती. त्यामुळे, महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लावता आली.
काही लोकांच्या बेईमानीमुळे राज्यातील डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
वांद्रे कुर्ला संकुलातील सभास्थळी मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभास्थळी सामान्याना सोडण्यात येणारे प्रवेशद्वार, अति महत्त्वाच्या व्यती आणि पत्रकारांच्या प्रवेशद्वाराबरोबरच ठिकठिकाणी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.
चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात शिक्षण घेतलेला सुबोध अशोक भैसारे (२६) याने राज्यात प्रथम क्रमांक, तर रेवती प्रशांत बागडे (२४) हिने मुलींमधून प्रथम, तर राज्यातून द्वितीय स्थान मिळवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण करण्यात येणर आहे. तसेच ते जनतेला संबोधित करणार असल्याने मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांचे आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही ताफा यात आहे. बाहेर गावातून येणाऱ्या अतिरिक्त बसमूळे सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी थोड्याच बिकेसी मैदानाकडे रवाना होणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ढोल-ताशे आणि लेझीम पथक बीकेसी मैदानावर दाखल झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचं स्वागत केले जाणार आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील अनेक मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. त्यामुळे, पर्यायी मार्गांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री विमानळावर दाखल झाले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे गुरुवारी या परिसरातील खासगी कार्यालयांना दुपारी १२ नंतर सुट्टी देण्यात आली होती. परिणामी, वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील कार्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ नंतर घरची वाट धरली.
नागपूर : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या देशामध्ये सुमारे २३ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागवण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाईन (क्रमांक १४५६७) सुरू केली आहे. ती सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत आहे.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली.