Narendra Modi Maharashtra Visit Live, 19 January 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता. मात्र, डबल इंजिनच्या सरकारवर जनतेला विश्वास आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा कायपालट होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचे रणशिंगही फुकले.
Maharashtra News, Narendra Modi Mumbai : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत कडेकोट सुरक्षा
पुणे : हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्याच्या अध्यादेशातील चुकीवर टीका झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने दुरुस्ती केली आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुनर्रचनेचा सुधारित शासकीय अध्यादेश काढून सांस्कृतिक विभागाने चूक सुधारली आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत वर्षभरापुर्वी संपुष्टात आली आहे. तरीही पालिकेतील पदाधिकारी आणि गटनेत्यांची कार्यालये सुरुच होती. याठिकाणी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा वावर सुरुच होता. याचमुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांनी पालिका प्रशासनावर टिका करत ही कार्यायले बंद करण्याची मागणी केली होती.
नागपूर : जीममध्ये कसरतीसाठी आलेल्या तरुणीला जीम ट्रेनर युवकाने अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी प्रेमविवाह केला. महिन्याभरातच घरी त्याची पत्नी आणि मुलगा आल्याने युवकाचे बिंग फुटले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने जाब विचारताच युवकाने तिच्याशी शारीरिक संबंधाचे मोबाईलने काढलेले फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसागणिक वाढू लागला असून, आव्हाड यांना धक्का देण्यासाठी त्यांच्या मुंब्य्रातील गडालाच सुरुंग लावण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील किमान आठ ते दहा माजी नगरसेवकांना गळाला लावत मुंब्रा येथील आव्हाड विरोधकांची मोट बांधण्याची रणनिती सध्या आखली जात असून, ‘मुंब्रा विकास आघाडी’ नावाने आव्हाडांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सविस्तर वाच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला आहे. एखाद्या गटाराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे, असे ते म्हणाले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे-कुर्ला संकुलात सभा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कमानी बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यापैकीच एक कमान कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही
नवी मुंबई – उजाड माळरानाला एक सुंदर स्वरूप देण्याचे काम उरण परिसरातील सारडे या गावातील सारडे विकास मंचच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या उजाड माळरानातील दगडांवर विविध चित्रे काढून हा परिसर अधिक सुशोभित करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या विविध प्रकल्पाच्या भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. हा प्रकार नजर चुकीने घडला असावा, अशी असे ते म्हणाले. तसेच अरविंद सावंत यांनी आपला कार्यक्रम समजून उपस्थित राहावं, अशी विनंतीही त्यांनी केली. सविस्तर वाचा
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी असताना राज्यभरात साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयुर्वेदिक डॉक्टर, बी टेक, एम कॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनी अर्ज केले आहेत.
अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची तपासणी करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडून (महारेरा) फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होत आहे. अशा ३०० हून अधिक प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली असली तरी सुरुवातीला ४० ते ४५ प्रकल्पांची छाननी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राखीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळ्याने तिला अटक करण्यात आली.
वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या देखभालीचे काम पुणे महापालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्युतदाहिनी क्रमांक एक बंद राहणार आहे.
करोनाने जगभरातच अनेकांना यमसदनी पाठवले. राज्याच्या उपराजधानीतही शेकडो लोकांना करोनाने मृत्यूच्या दारात लोटले. करोनाचा प्रादूर्भाव ओसरला आणि सारेच आरोग्याप्रती सजग झाले. यातून मृतात्मेही सुटले नाहीत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. यामुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन सराईत मोबाईल चोरांना अटक केली आहे. ते उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून ९३ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
गोंडवाना विद्यापीठातील नवनिर्मित सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य दत्ता डीडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरवावरून पहिल्याच अधिसभेत सदस्यांमध्ये वादळी चर्चा झाली.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (विमाशि) उमेदवार सुधाकर अडबाले यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गटागटात विभागलेले काँग्रेसचे नेते अडबाले यांना निवडणुकीत मदत करतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानिमित्त मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून उपस्थित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
महेश पवळे म्हणाले,की शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
सप्तश्रृंग गडावरील मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामास महिनाभरात सुरूवात होणार आहे. पुढील चार ते पाच दशकांचा विचार करून हे काम करण्यात येणार आहे. श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने कर्मचारी, सेवक आणि पुजाऱ्यांसह गडावरील ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मृतक विद्यार्थिनी आरती मदन गुरव (१९) ही भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बिई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून महापालिकेला ९००० लसींची मात्रा प्राप्त झाली आहे. कोव्हिशिल्डच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या दहाही झोनमधील १५ केंद्रांवर उद्या गुरुवारपासून लसीकरण सुरू होणार आहे.
शहरातील भटक्या श्वानांबाबत महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी कडक धोरण अवलंबले होते. भटक्या श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यावर निर्बंध आणले होते आणि त्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या.
धीरेंद्र कृष्ण महाराजांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन केले. ते हिंदू लोकांना फसवत असतानाही त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. या खात्याचे प्रमुख तुम्ही आहात. त्यामुळे हिंदू लोकांना फसवणाऱ्यांचे समर्थन तुम्ही करणार का, असा थेट सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होतेच कशी, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरण मंत्रालयाला केला. याप्रकरणी आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश देत पीडित मुलाच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याबाबतही न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला.
राज्यात युती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुंबईत येत असून ही सभा भव्य आणि अविस्मरणीय ठरावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात युती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुंबईत येत असून ही सभा भव्य आणि अविस्मरणीय ठरावी यासाठी #बाळासाहेबांची_शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष संपूर्णपणे सज्ज आहोत. pic.twitter.com/FH212gfnQ4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 18, 2023
आंतरजातीय विवाह आणि पुनर्विवाह या गोष्टी कायदेशीर असून देखील जात पंचायतीच्या मनमानीमुळे श्री गौड ब्राह्मण समाजातील सुमारे ४०० विवाह रखडले आहेत. जात पंचायतीचा धाक दाखवून कुटुंबांना बहिष्कृत करणे, दंड ठोठावणे असे बेकायदेशीर प्रकारही सर्रास चालू आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दोन मेट्रो मार्गिकांना एकत्र जोडणारे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची कामे वेगाने सुरू आहेत. शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची खोली जमिनीच्या १०८ फूट खाली (३३.१ मीटर) एवढी असून, शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून बीकेसी मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात करण्यात आलेल्या विधानांवर विरोधकांकडून मात्र हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘शिवसेनेच्या काळात झालेल्या कामांचं उद्घाटन मोदी करत आहेत’, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं आहे. तसेच, त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. सविस्तर वाचा
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली.