PM Narendra Modi On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रात प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते देखील विविध मतदारसंघात सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरच्या चिमुरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच कलम ३७० बद्दल भाष्य करत जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे ३७० कलम कायमचं जमिनीत गाडलं, असंही म्हणाले. तसेच महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
PM Narendra Modi : “महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, भ्रष्टाचारात काँग्रेसची पीएचडी”
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा केला.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-11-2024 at 14:06 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on mahavikas aghadi in corruption khiladi chimur chandrapur sabha in maharashtra vidhan sabha election 2024 gkt