पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी माफी मागितली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात गेले”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली.

vinod tawde
जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
s Jaishankar
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
Selected reactions to the article pracharak sanghacha kana
पडसाद : हे कौतुक फार दिवस पुरणार नाही…
aarya jadhao called suraj chavan
आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नेहमी बोललं जातं. त्यांचा अपमान केला जातो. मात्र, विरोधकांनी कधीही माफी मागितली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करूनही माफी तर मागितली नाहीच. मात्र, ते न्यायालयामध्ये जातात. त्यांना कधीही याबाबत पश्चात्ताप झाला नाही किंवा होत नाही. कारण हे त्यांचे संस्कार आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या संस्कारांना चांगलं ओळखते. पण आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला.

मोदी पुढे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी जे काही घडलं ते दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो”, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली.

महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल

“आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या १० वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. या बंदरासाठी जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काही लोकांकडून महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न

“२०१४ आधी वाढवण बंदराचं काम रोखून धरण्यात आलं होतं. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केलं. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडलं. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचं आहे”, असंही ते म्हणाले.