ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर २०२४ च्या निवडणुकीआधी मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता, असं मोठं विधान राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीस मरगळ झटकून पुढचे दमदार पाऊल टाकायला लावणारे हे निकाल आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर २०२४ च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता. एखादे नवे ‘पुलवामा’ घडताना उघड्या डोळ्याने पाहिले असते. काश्मीरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात आहे, ‘देश खतरे में है’च्या गर्जना करून ‘देशभक्ती’साठी भाजपाने मते मागितली असती. जवानांच्या शवपेट्यांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता, अशी टीका संजय राऊतांनी केली.

vinod tawde
जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
loksatta readers response
लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
Sanjay Raut on Amit Thackeray Mahim Vidhan Sabha Constituency
Sanjay Raut on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान; म्हणाले, “तो आमच्या…”
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”

“प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीआधी दंगली व मोठ्या नरसंहाराचा बेत तडीस नेला असता. आशा आहे, तीन राज्यांतील विजयांमुळे हे बेत तूर्त रहीत केले जातील! पण तीन राज्यांमधील विजय म्हणजे २०२४ च्या विजयाचा शंखनाद या भ्रमात जे आहेत त्यांनी त्याच भ्रमात राहणे देशहिताचे आहे,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा- गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीवर भाजपा नेत्याची प्रतिक्रिया, घटनेचा निषेध करत म्हणाले…

दरम्यान, राऊत यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केलं. मध्य प्रदेशातील भाजपाच्या यशात काँग्रेसच्या कमलनाथ यांचं मोठं योगदान असल्याचं राऊतांनी म्हटलं. कमलनाथ हे सकाळी दहा वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडत, दुपारी एक वाजता ते त्यांच्या छिंदवाड्यातच एखादी सभा घेऊन घरी परत येत असत. दुसरीकडे, शिवराज सिंह चौहान यांनी दिवसातून १५-१५ सभा घेत भाजपाला विजयाच्या शिखरावर नेले. मोदी आणि भाजपाच्या सोयीचं राजकारण करणारे लोक गांधींच्या अवतीभवती असतील तर २०२४ ला काँग्रेसला अधिक धोका निर्माण होईल, असं स्पष्ट विधान राऊतांनी आपल्या लेखातून केलं आहे.