डी. जी. तटकरे महाविद्यालय माणगाव येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या रायगड विभागीय खो-खो स्पर्धामध्ये पी.एन.पी. महाविद्यालय वेश्वी अलिबाग संघाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आणि जिल्ह्य़ामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.
या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल प्रभाकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, संस्थेचे प्रशासन अधिकारी सुभाष कुलकर्णी, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी- अमोल नाईक, पी.एन.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य संजीवनी नाईक व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर संघास यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pnp college success in kho kho tournament