वर्धात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट येथे विष पाजून १९ वर्षी प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, तरुणानेही विष पिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर दोघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमन निखार ( २२ वर्ष, रा. ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट ) असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणांचं नाव आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही याचा राग अमनला होता. त्याच रागातून कामनिमित्ताने मैत्रिणीबरोबर घराच्या बाहेर पडलेल्या प्रेयसीला रस्त्यात अमनने गाठलं. त्यानंतर आपल्या गाडीवर बसवून तिला निर्जनस्थळी घेऊन गेला.

हेही वाचा : प्रियकर, ओळखीचे, नातेवाईकांकडूनच महिलांवर सर्वाधिक अत्याचार

तिथे सोबत आणलेले विष अमनने तरुणी प्रेयसीला पाजलं. त्यानंतर स्वत:ही विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, “दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीच्या जबाबावरून ११५/२०२३ कलम ३०७, ३२८, ३०९ यानुसार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी दिली आहे.