सांगली : लग्नाळूंच्या गरजांचा फायदा उठवत मुलींच्या लग्नाचा बाजार मांडणार्या एका महिलेसह दोघांना विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. पती निधनानंतर रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलेला तिसर्यांदा तिचा विवाह करण्यासाठी पळवून नेत असताना पोलीसांनी अटकेची कारवाई केली. महिलेने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील लोकांनी वाहन थांबवून विचारपूस केली असता हा लग्नाचा बाजार उघड झाला.
हेही वाचा >>> संविधान, लोकशाहीवर दुटप्पी विरोधकांचा विश्वास नाही : देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
याबाबत माहिती अशी की, पती निधनानंतर इचलकरंजी येथे आईकडे राहणार्या एका महिलेने मैत्रिणीला काम मिळवून देण्याची विनंती केली. या मैत्रिणीने तिला वर्षा जाधव यांचा भ्रमणध्वनी नंबर देउन संपर्क साधण्यास सांगितले. यानुसार या महिलेने संपर्क साधला असता तिला कराड येथे बोलावून तिचे एकाशी लग्न लावून दिले. त्यानंतर या पतीच्या घरी गेल्यानंतर परधर्माची असल्याने त्यांने परत या महिलेकडे आणून सोडले. यानंतर तिचे सांगली जिल्ह्यातील एकाशी विवाह लावून दिला. तैथूनही पैसे घेण्यात आले. मात्र पुन्हा तिला कराडला नेउन तिच्याकडील दागिने काढून घेउन तिला परत पाठविले.
हेही वाचा >>> “एका पक्षात तीन तीन मुख्यमंत्री…”, ‘भावी मुख्यमंत्री’च्या पोस्टरवरून नाना पटोले स्पष्टच बोलले!
या दोन लग्नानंतर तिला पुन्हा तिसरे लग्न करण्यासाठी मोटारीतून विश्रामबागमधून नेत असताना तिने आरडाओरडा केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीसांना माहिती दिली. यावेळी पोलीसांनी तिला जबरदस्तीने लग्नासाठी नेत पळवून नेत असतान वर्षा जाधव (रा. सुलतानगादे ता. खानापूर) आणि शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कराड) या दोघांना बुधवारी अटक केली.