बनावट कागदपत्र आणि बनावट नंबर प्लेट व चेसी नंबरमध्ये हेरफार विक्री करणाऱ्या टोळीला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांच्या १२ ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या इकरा कॉलनी येथे राहणाऱ्या शेख साजिद शेख अब्दुल हा ट्रान्सपोर्ट कमिशन एजंटचा व्यवसाय करतो. त्याच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत आठ ट्रक उभे आहेत. या ट्रकवरील इंजिन आणि चेसी नंबरमध्ये अदलाबदल केल्याची गुप्त माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख साजिद शेख अब्दुल याची चौकशी केली. यात त्याने या ट्रक विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. सदर ट्रकांची आरटीओ कार्यालयाकडून खात्री केली असता, त्यांचे चेसी नंबर आणि इंजिन नंबर हे खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सखोल तपास करीत या कारवाईत तब्बल १२ ट्रक जप्त केले. या कारवाईत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी साजिद शेख अब्दुल मनियार, आरटीओ एजंट इफतेकार अहमद अब्दुल जब्बार शेख ऊर्फ पापा एजंट त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : आष्टीजवळ गुन्हेगारांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन कर्मचारी जखमी

आरोपींनी साथीदारांच्या मदतीने संगनमताने या बनावट ट्रक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणूक करून वापरासाठी तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने बनावट इंजिन नंबर प्रेस करून ट्रक वापरत असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली.