ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना औरंगाबाद शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी कलम १४४(१) नुसार ओवैसी यांना नोटीस बजावली असून, शहरात न येण्याची सूचना केली आहे. नोटिसीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. त्यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी ही नोटीस काढली.

Story img Loader