बीड : करोना काळातील कंत्राटी पध्दतीवरील कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने संतप्त होऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेवरून आक्रमक होत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यपध्दतीवर टीकास्त्र सोडले. आरोग्यमंत्री केवळ जालना जिल्ह्यपुरतेच आहेत का? त्यांच्या जिल्ह्यला एक आणि इतर जिल्ह्यला एक न्याय कसा, असा प्रश्न उपस्थित करत आमदार धस यांनी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराच दिला. करोनाच्या काळात सख्खा भाऊ किंवा आई-वडीलही जवळ येत नव्हते. त्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक होते. नोकरी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले हे सरकारच्या अकार्यक्षमतेचेच प्रतीक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन उभे करावे. आपण सर्व सहकार्य करू, अशी ग्वाहीही आमदार धस यांनी दिली.
अजित पवारांचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2021 at 00:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police beat up protesters blocking ajit pawar convoy ssh