राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या व्यवस्थापकाला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. धानोरकर हे चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे खासदार आहेत.

२२ मे २०२२ रोजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक असल्याने सध्या सर्व कार्यभार निवडणूक अधिकारी सांभाळत आहे. या निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून नामनिर्देशन स्वीकारण्याचे काम सुरू झाले आहे. अशातच खासदार धानोरकर यांनी १९ एप्रिलला त्या सहकारी संस्थेत पोहचत व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांना संपर्क साधत सहकारी संस्थेत बोलाविले.

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

व्यवस्थापक गोविंद ठाकरे हे तात्काळ संस्थेत दाखल झाल्यावर खासदार धानोरकर यांनी निवडणूक संबंधित कागदपत्रांची मागणी केली. यावर ठाकरे यांनी असमर्थता दाखवीत नियमाप्रमाणे ते कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्याकडून घ्यावे लागतील असे सांगितले. मात्र खासदार धानोरकर ठाकरेंवर संतापले व ‘तू मला शिकवतो काय,’ असं म्हणत कागदपत्रे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी ठाकरे यांना दिली. इतकेच नव्हे तर खासदारांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याशी धक्काबुक्की केली, खासदार धानोरकर हे ठाकरे यांच्या अंगावर धावून गेले असता त्यांच्या अंगरक्षकाने मध्यस्ती केली. यावर ठाकरे यांनी भद्रावती पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.

भद्रावती पोलिसांनी खासदार धानोरकर यांचेविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. भद्रावती विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादितचे व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांनी सुधीर पिदूरकर, सतीश नगराळे, राजू टाले व उमेश जीवतोडे यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत खासदार धानोरकर यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली.

Story img Loader