गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील माळरानावरील देवीच्या मंदिरासमोर शनिवारी गुप्तधन शोधण्यासाठी पुजाअर्चा केली. या वेळी नरबळी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. ही माहिती मिलिंद गायकवाड यांनी सोनपेठ पोलिसांना दिली. फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांअतर्गत ९ जणांवर गुन्हा दाखल झाला. आरोपींच्या शोधात पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठविली. भालचंद्र शिंदे, नìसग कावळे, शेख बाबू शेख उस्मान, शेख मोईन शेख नजीर व राम कुंडलिक ढेंबरे या पाचजणांना मंगळवारी अटक केली. या आरोपींना न्या. एस. वाय. कदम यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील परभणी येथील डॉ. मगरे व सुनील वाटोळेसह इतर दोघे फरारी आहेत.
आणखी वाचा