राजापूर : तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपसह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी मनाई केली आहे.

आता बदललेल्या कार्यक्रमानुसार, उद्धव ठाकरे हे शनिवारी सकाळी १० वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. तिथून ते बारसू येथील कातळशिल्पाला भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधतील. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दुपारी ते महाडला रवाना होणार आहेत.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी चालू असलेल्या ड्रिलिंगच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या आठवडय़ात जोरदार विरोध केल्याने आंदोलनाला िहसक वळण लागले. त्यानंतर तूर्त आंदोलन स्थगित झाले असले तरी पुन्हा आंदोलक बारसू परिसरातील सडय़ावर जमा होऊ लागले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसल्याने पोलिसांनी जाहीर सभेला परवानगी नाकारली.

ठाकरेंच्या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी प्रकल्प समर्थकांकडून शहरात मोर्चा आयोजित करण्यात आला. पण, त्यासही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

सात जण ताब्यात

प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे, पत्नी मानसी आणि इतर सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनाई आदेश मोडल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

Story img Loader