सांगली: पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक चळवळही युवक वर्गात रूजावी यासाठी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला असून प्रत्येक सार्वजनिक मंडळाना रोप देण्यात आले आहे. तसेच कार्यक्षेत्रातील चार ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे प्रभारी अविनाश पाटील यांनी शुक्रवारी दिली.

सार्वजनिक मंडळाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना वृक्षाचे रोप देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच देण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर सोपविण्यात आली आहे. कार्यक्षेत्रातील १५० मंडळांना रोपांचे वाटप करण्यात आले असून ही रोपे वड, चिंच, लिंब या देशी वृक्षाची आहेत.

हेही वाचा… ध्वनी मर्यादा उल्लंघन प्रकरणी तांत्रिक कारणामुळे मर्यादा

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे यासाठी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कानडवाडी, सावळी, मानमोडी आणि पोलीस ठाणे या चार ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सहभागी तरूणांना पोलीस ठाण्याच्यावतीने प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सहायक निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Story img Loader