सातारा : चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू उत्तम निकम ( माहुली, ता. खानापूर, सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद गुरुवारी सातारा शहर पोलिसांत दाखल झाली आहे.

निकम यांचा मुलगा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला भेटण्यासाठी २७ फेब्रुवारीला त्याचे वडील राजू निकम आले होते. त्यांनी मुलाची कपडे कारागृहात दिली. कारागृहातील मुख्य दरवाजाजवळ कर्मचाऱ्यांनी कपड्यांची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशामध्ये त्यांना मोबाइलचे सिमकार्ड सापडले. त्यानंतर कारागृहातील कर्मचारी राकेश पवार यांनी दि. ६ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बंदिवान आणि त्याचे वडील राजू निकम यांच्यावरही गुन्हा दाखल केला.

वडिलांनी कारागृहात मुलाला सिमकार्ड दिले. यामुळे कारागृहात मोबाइल तर नाही ना, अशीही शंका पोलिसांना आहे. परंतु कारागृहात जॅमर असतानासुद्धा मोबाइल सुरू कसा राहील, असाही प्रश्न उपस्थि होतो. तर दुसरीकडे कपडे धुतल्यानंतर चुकून सिमकार्ड कपड्यातून गेले असेल असे निकम सांगत आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत