धुळे शहरातील चैनीरोडवरील मच्छीबाजार, माधवपुरा भागात रविवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले. दगडफेक, जाळपोळ, हाणामारी करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. दंगलीनंतर परिसरात संचारबंदी लावण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दंगलीचे कारण अधिकृतपणे दिले नसले तरी, लहान मुलांच्या खेळण्यावर झालेल्या वादातून दोन गटांत ही दंगल उसळल्याचे बोलले जात आहे. हा वाद पेटल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगड-विटांसोबत अ‍ॅसिड आणि पेट्रोलच्या जळत्या बोळ्यांचा मारा करण्यात आला. या वेळी अनेक घरे व दुकाने पेटवून देण्यात आली, तर पाच-सहा मोटारसायकलींनाही दंगेखोरांनी लक्ष्य केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या वाहनांवरही मोठय़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मात्र, त्यानंतरही  हिंसाचार थांबत नसल्याचे पाहून सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास महसूल विभागाने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. दंगल व गोळीबारादरम्यान २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले. त्यापैकी आशिक महंमद (३५), महंमद पटेल (१८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मृताचे नाव समजू शकले नाही. जखमींमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी मोनिका राऊत आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशिरा मच्छीबाजार माधवपुरा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगलीचे लोण शहरातील इतर भागांत पसरू नये यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.

samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू
Story img Loader