गुन्ह्याच्या तपास कामात मदत करण्याच्या बहाण्याने ५ हजार रुपयांची लाच घेताना सापडलेल्या कवठेमहांकाळ येथील सहायक फौजदार श्रीराम जाधव याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले.
संभाजी लंगोडे (रा. कोकळे) याला तपास कामात सहकार्य करण्यासाठी ५ हजार रूपयेची लाच जाधव यांनी मागितली होती. गुरुवारी लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडल्याने त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आज त्याला निलंबित करण्यात आले. त्याच्यासोबत तुकाराम पवार यालाही अटक करण्यात आली आहे.

Story img Loader