“राष्ट्र सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व आहेच, पण आताही राष्ट्र सेवा दल समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक घडविते,” असं मत सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी व्यक्त केले. ते इचलकरंजीमधील चंदूर येथे राष्ट्र सेवा दलाच्या संजीवन विद्यामंदिर येथील शिबिर समारोपप्रसंगी बोलत होते.

यावेळी राष्ट्र सेवा दल, इचलकरंजीच्या कार्याध्यक्ष इंद्रायणी पाटील म्हणाल्या, “किशोरवयीन मुलांच्या मनोभूमीवर संविधानिक मुल्यांची पेरणी करणारे हे शिबिर यशस्वी झाले. यात शिक्षक, पालक, बालक आणि लोकसहभाग यांचा सुंदर मिलाफ घडून आला.

“बाल आनंद संस्कार शिबिरातूनच आदर्श नागरिक घडणार”

मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर म्हणाले, “बाल आनंद संस्कार शिबिरातूनच आदर्श नागरिक घडणार आहेत. व्यावसायिक शिबिरांना फाटा देवून तळागाळातील मुलांपर्यंत कौशल्ये आणि संस्कार पोहचवण्याचे महत्त्वाचे काम तरुणाईकडून घडते आहे, हे सुचिन्ह आहे.”

व्हिडीओ पाहा :

यावेळी इंद्रजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. मैदानप्रमुख रोहित दळवी यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थींना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मुलांनी झांज, लेझीम, कॅलेस्थेनिक्स, समुहगीते सादर केली. स्मिता पाटील कलापथकाने ‘हर घर संविधान’ पथनाट्य सादर केले.

हेही वाचा : “संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही आणि…”, डॉ. विश्वंभर चौधरी यांचं नास्तिक परिषदेत वक्तव्य

या शिबिरात प्रशिक्षक म्हणून दामोदर कोळी, वैभवी आढाव, ओम कोष्टी, साद चांदकोटी,स्नेहल माळी, अमोल पाटील आदिंनी काम केले. याचा समन्वय करण्यासाठी अमित कांबळे, गजानन तोरणे, सचिन शिंदे, विवेक कांबळे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी सरपंच स्नेहल कांबळे, महंमद मकुभाई, उपसरपंच संजय जिंदे, वैशाली पाटील, शालनताई पाटील, गजानन जगताप, नौशाद शेडबाळे, शरद वास्कर, प्रशांत खांडेकर आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुखदेव पाटील यांनी केले, तर लताराणी पाटील यांनी आभार मानले.

Story img Loader