पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान केला जाणार आहे. त्यांनी दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना हे पदक दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रश्मी करंदीकर यांचं नाव पहिलं आहे. तर देशभरातल्या एकूण ७५३ अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातून रश्मी करंदीकर, संजय जाधव, राजेश्वरी कोरी, रविंद्र चारदे, अरुण परिहार, अमित तिमांडे आणि योगेश जाधव या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. रश्मी करंदीकर या सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत आहेत.

पोलीस खात्यात भरती होते, तेव्हा ती व्यक्ती असते अक्षरशः मातीच्या गोळ्यासारखी! त्या व्यक्तीच्या संपर्कात येणारा पहिला वरिष्ठ अधिकारी तिला ठाकून ठोकून ‘घडवण्याची’ प्रक्रिया सुरू करतो, तेव्हाच त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार प्राप्त होतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्चना त्यागी मॅडमसारखे कर्तव्यतत्पर असतील तर? प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांच्या हाताखाली मी रुजू झाले आणि माझा उमेदवारीचा काळ कसा असेल ते लगेच माझ्या लक्षात आलं असं रश्मी करंदीकर म्हणाल्या होत्या.

रश्मी करंदीकर या उत्तम पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रपती पदकासाठी त्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या ७८ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक दिलं जाणार आहे. त्यात रश्मी करंदीकर यांची निवड झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer rashmi karandikar honoured with president medal for meritorious service scj