कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रायबागमध्ये आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा आंबोली घाटातील ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मितीलेश पॅकेरा असे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा – कुकी महिलांकडून मैतेई लोकांचे संरक्षण; हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मानवी साखळी

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड रिझर्व पोलिसांची एक तुकडी कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आली होती. यादरम्यान काही काळ सुट्टी मिळाल्याने या तुकडीतील पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्याहून परतत असताना यापैकी तिघे जण आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. यावेळी मितीलेश पॅकेरा हे दरीच्या दिशेने जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते जवळपास ३०० फूट खोल दरी कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती लगेच आंबोली पोलिसांना दिली. काही वेळातच आंबोली पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मितीलेश यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

हेही वाचा – मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता, परिस्थिती पूर्वपदाकडे ; हिंसाचाराचे ५४ बळी

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ते मितीलेश यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसेच मितीलेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. आज शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.